मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला अटक झाली आहे. राज कुंद्रावर अश्ली_ल फिल्म तयार करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी राज कुंद्राला अटक केली असून 23 तारखेपर्यंत कोठडी देण्यात आली आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर सोशल मीडियावर मीम्स आणि ट्रोल करण्यास सुरुवात झाली. राज कुंद्राच्या अटकेनंतर क्रिकेटपटू देखील अडचणीत सापडला आहे.
टीम इंडियाचा खेळाडू अजिंक्य रहाणे आपल्या एका जुन्या ट्वीटमुळे अडचणीत येणार का अशी शंका उपस्थित होत आहे. अजिंक्य रहाणे याने केलेलं ट्वीट पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर रहाणेला ट्रोल केलं जात आहे.
Leaked chat between Ajinkya Rahane and Raj Kundra #Pegasus #PegasusProject @Tushar_KN @Rightweety @BhatiaCrish @VarunKrRana @Megatron9091 @RijulJk pic.twitter.com/edRWU0DXgj
— Mastishhk22 (@mastishhk22) July 20, 2021
अजिंक्य रहाणे-राज कुंद्रा यांचं जुनं ट्वीट व्हायरल अजिंक्य रहाणे यांचे एक जुनं ट्विट व्हायरल होत आहे. रहाणेने 19 ऑक्टोबर 2012 रोजी राज कुंद्राला टॅग करत एक ट्वीट केलं होतं. त्यामध्ये असं लिहिलं होतं की, 'सर तुम्ही खूप चांगलं काम करत आहात. या ट्वीटवर कुंद्राने रहाणेचे आभार मानले होते. त्यावर रिप्लाय देताना राज पुढे म्हणाला होता की तू एकदा येऊन लाईव्ह बघ आणि त्यानंतर रहाणेने 'हो, मी नक्की येईन' असा रिप्लायही केला होता.
Kitne Tejaswi log hai humare paas!
PMO Ask CBI Report On SSR#BoycottBollywood #RajKundraArrest pic.twitter.com/O0v96YpBFN
— KIZIE #JusticeForSushantSinghRajput (@Sushantify) July 20, 2021
Kitne Tejaswi log hai humare paas!
PMO Ask CBI Report On SSR#BoycottBollywood #RajKundraArrest pic.twitter.com/O0v96YpBFN
— KIZIE #JusticeForSushantSinghRajput (@Sushantify) July 20, 2021
@ajinkyarahane88 thanks so much. U must come and see it live
— Raj Kundra (@TheRajKundra) October 19, 2012
IPLमध्येही राज कुंद्रावर बंदी
IPL मध्ये 2013च्या हंगामात खूप मोठा वाद झाला होता. IPLमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकणात सर्वात मोठा ठप्पा राज कुंद्रावर ठेवण्यात आला होता. BCCIने तीन खेळाडूंवर या प्रकरणी कारवाई केली होती. तर राज कुंद्रावरही बंदी आणण्यात आली होती.
शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा राजस्थान रॉयल्स संघाचे सह-मालक होते. आयपीएलमधील मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीसंदर्भात उद्योगपती राज कुंद्रा बराच काळ संशयाच्या भोवऱ्यात होता. लोढा समितीने सट्टेबाजी केल्याबद्दलही त्याला दोषी ठरविण्यात आले होते आणि क्रिकेटशी संबंधित कामांमध्ये कधीही भाग न घेण्याचेही त्याला आदेश देण्यात आले होते. राजस्थान रॉयल्सलाही 2 वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागले.