IPL 2023: मार्च नाही तर 'या' महिन्यात सुरू होणार आयपीएल; BCCI मोठ्या निर्णयाच्या तयारीत!

IPL 2023 First Match Date: इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2023) 16 वा हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. लीगचा 16 वा हंगाम आता मार्चमध्ये सुरू होण्यासाठी काही दिवसांच्या विलंब सुरू होऊ शकतो.

Updated: Dec 11, 2022, 11:49 PM IST
IPL 2023: मार्च नाही तर 'या' महिन्यात सुरू होणार आयपीएल; BCCI मोठ्या निर्णयाच्या तयारीत! title=
BCCI, IPL 2023

BCCI ipl 2023 schedule: तरुणाईची सर्वात लाडकी लीग म्हणजे आयपीएल... अनेक क्रिकेटप्रेमी इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League 2023) म्हणजेच आयपीएलच्या पुढील हंगामाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. महेंद्रसिंह धोनीसारखे अनेक दिग्गज खेळाडूंसाठी आगामी हंगाम अखेरचा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वजण मार्चची वाट पाहत असल्याचं दिसतंय. अशातच आता आयपीएल प्रेमींसाठी वाईट बातमी समोर आली आहे. (indian premier league 2023 updates and schedule starting date bcci mahila ipl bcci big decision marathi news)

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2023) 16 वा हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. लीगचा 16 वा हंगाम आता मार्चमध्ये सुरू होण्यासाठी काही दिवसांच्या विलंब सुरू होऊ शकतो. महिनाभर आयपीएल सामने पुढे ढकलले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

आयपीएल पुढं ढकलण्याचं कारण म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपही याच दरम्यान होणार आहे. अशा परिस्थितीत मोठे खेळाडू आयपीएलमधून सुट्टी घेऊ शकतात. यामुळे पाहता बीसीसीआय (BCCI) एप्रिलपर्यंत आयपीएल पुढे घेण्याचा प्रयत्न करत आहे.

आणखी वाचा - Sanju Samson ला 'या' देशाच्या क्रिकेट बोर्डाची ऑफर; संजूला टीममध्ये न घेणं BCCI ला पडणार महागात

दरम्यान, महिला आयपीएलची (Women IPL) सुरूवात टी-ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलच्या (T20 World Cup) एक आठवड्यानंतर सुरू होईल. महिला T20 वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना 26 फेब्रुवारी रोजी केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे. बीसीसीआयने अद्याप तारखा जाहीर केल्या नसल्या तरीही बीसीसीआय पहिल्यांदाच महिला आयपीएलचे आयोजन करत आहे. त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.