भारताच्या आणखी एका क्रिकेटरला सरकारी नोकरी, मोहम्मद सिराज झाला तेलंगणाचा DSP

सचिन तेंडुलकर ते एम एस धोनी, हरभजन सिंह पर्यंत अनेक खेळाडूंकडे सरकारी नोकरी आहेत. आता या लिस्टमध्ये टीम इंडियातील अजून एका खेळाडूच्या नावाचा समावेश झाला आहे. टीम इंडियातील वेगवान गोलंदाजाला तेलंगणा पोलिसात पोलीस उपाधिक्षकाची नोकरी मिळाली आहे.

पुजा पवार | Updated: Oct 11, 2024, 07:48 PM IST
भारताच्या आणखी एका क्रिकेटरला सरकारी नोकरी, मोहम्मद सिराज झाला तेलंगणाचा DSP  title=
(Photo Credit : Social Media)

Mohammad Siraj DSP At Telangana : क्रिकेट हा भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळ असल्याने भारतात क्रिकेटर्सची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे. भारत सरकार खेळ कोट्यातून काही खेळाडूंना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करून देते. सचिन तेंडुलकर ते एम एस धोनी, हरभजन सिंह पर्यंत अनेक खेळाडूंकडे सरकारी नोकरी आहेत. आता या लिस्टमध्ये टीम इंडियातील अजून एका खेळाडूच्या नावाचा समावेश झाला आहे. टीम इंडियातील वेगवान गोलंदाजाला तेलंगणा पोलिसात पोलीस उपाधिक्षकाची नोकरी मिळाली आहे.

भारतीय पुरुष क्रिकेट टीममधून खेळणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने शुक्रवारी तेलंगणा पोलीस उपाधिक्षकाचा पदभार स्वीकारला आहे. त्याने तेलंगणाच्या पोलीस महानिदेशक यांना रिपोर्ट केल्यावर उपाधिक्षकाचा पदभार स्वीकारला. यावेळी खासदार एम. अनिल कुमार यादव, टीजीएमआरईआईएसचे  अध्यक्ष मोहम्मद फहीमुद्दीन कुरैशी हे सुद्धा उपस्थित होते. सीएम रेवंत रेड्डी यांनी आधीच घोषणा केली होती की सिराजला प्रतिष्ठित ग्रुप-। ला सरकारी पद देण्यात येईल. 

हेही वाचा : VIDEO : 'विराट भाई... आग लावायचीये...' चाहत्याने विचारलेला प्रश्न ऐकून कोहलीने दिली अशी रिऍक्शन

मोहम्मद सिराजने पदभार स्वीकारल्यावर मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तेलंगणा पोलिसांनी ट्विटरवर लिहिले की, "भारतीय क्रिकेटर मोहम्मद सिराज यांना त्यांच्या क्रिकेटमधील कामगिरी आणि राज्याप्रती समर्पणा हेतू तेलंगानाचे डीएसपी नियुक्त केले आहे. तो त्याच्या नवीन भूमिकेसाठी अनेकांना प्रेरणा देऊन आपली क्रिकेट कारकीर्द सुरू ठेवेल."

मोहम्मद सिराजची कारकीर्द : 

मोहम्मद सिराजने भारताकडून 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सिराज भारताकडून  वनडे, टेस्ट आणि टी २० क्रिकेटमध्ये खेळतो. त्याने आतापर्यंत 29 टेस्ट , 44 वनडे आणि 16 टी 20 सामने खेळले आहेत. मोहम्मद सिराज टीम इंडियाच्या आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या विजेत्या टीमचा भाग होता.