मुंबई : कोरोना लॉकडाऊनमुळे टीम इंडियाचे क्रिकेटपटू त्यांच्या घरामध्येच आहेत. घरातूनच हे क्रिकेटपटू त्यांच्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. यामुळे क्रिकेटपटूंची आलिशान घरंही त्यांच्या चाहत्यांना पाहण्याची संधी मिळत आहे.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने काही महिन्यांपूर्वीच मुंबईमध्ये युवराज सिंगच्या बाजूला घर खरेदी केलं. या घराची किंमत ३४ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. विराट कोहली दिल्लीचा असल्यामुळे तिकडेही त्याचा एक बंगला आहे. शिवाय दिल्लीमध्येच विराटने आणखी एक नवीन घर विकत घेतलं आहे. हे घरं ५०० स्क्वेयर यार्डात बनवण्यात आलं आहे. विराटच्या या घरात जिम, स्विमिंग पूल, पार्किंग आणि गार्डन या सुविधाही आहेत.
क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरचा मुंबईच्या वांद्रे भागात ५ मजली आलिशान बंगला आहे. सचिनचे हे घर जवळपास ६ हजार स्क्वेअर फूट एवढं मोठं आहे. सचिनच्या घरात स्वीमिंग पूलपासून पार्किंगच्या सगळ्या अद्ययावत सुविधा आहेत.
भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंगचं घरही आलिशान आहे. हरभजन सिंगचा हा बंगला चंडीगडमध्ये आहे. भज्जीचं घर २ हजार स्केयर यार्डात पसरलं आहे.
टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीचं घर रांचीमध्ये आहे. धोनीने स्वत:च त्याच्या बंगल्याचं डिझाईन केलं आहे. बंगल्यामध्ये धोनीने हवा खेळती राहण्यासाठी मोठ्या खिडक्याही लावल्या आहेत. धोनीच्या बंगल्यामध्ये मोठा स्विमिंग पूल आणि गार्डनही आहे. धोनीला बाईक आणि कारचं प्रचंड वेड असल्यामुळे बंगल्यात पार्किंगसाठी मोठी जागा ठेवण्यात आली आहे.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचं घरही आलिशान आहे. सौरव गांगुलीचा कोलकात्यामध्ये बंगला आहे. गांगुलीच्या ४ मजली बंगल्यामध्ये जवळपास ४८ खोल्या आहेत.