Hardik Pandya | स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्या टीम इंडियामधून कायमचा 'आऊट'?

टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्या (hardik pandya) गेल्या काही काळापासन संघर्ष करतोय. 

Updated: Jan 5, 2022, 10:48 PM IST
Hardik Pandya | स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्या टीम इंडियामधून कायमचा 'आऊट'? title=

मुंबई :  टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्या (hardik pandya) गेल्या काही काळापासन संघर्ष करतोय. हार्दिकला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. टी 20 वर्ल्ड कपनंतर तो संघात दिसला नाही. हार्दिकसमोर फिटनेसचं आव्हान आहे. हार्दिकला ना धड बॅटिंग करता येत आहे ना बॉलिंग. आधी हार्दिकची जागा कोण घेणार असं म्हंटलं जायचं. पण आता टीममध्ये असा खेळाडू आला आहे, जो हार्दिकच्या जागी प्रबळ दावेदार आहे आणि निवड समितीची पहिली पसंत आहे. हा खेळाडू हार्दिकची जागा कायमची घेऊ शकतो. (indian cricket team shardul thakur can replace all rounder hardik pandya)   

शार्दुल ठाकूर

'पालघर एक्सप्रेस' शार्दुल ठाकूर हार्दिक पंडयाची जागा घेऊ शकतो. शार्दुल हार्दिकची परफेक्ट रिप्लेसमेंट आहे. शार्दुल बॉलिंग अफलातून करतो. तसेच निर्णायक क्षणी फटकेबाजी करण्याची क्षमता ही त्याच्यात आहे.

त्यामुळे शार्दुल हा हार्दिकची जागा घेऊ शकतो. शार्दुल सध्या आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळतोय. शार्दुलने दुसऱ्या कसोटीत 7 विकेट्स घेण्याचा कारनामा केला. तसेच बॅटिंगनेही 28 धावांचं योगदान दिलं.    

हार्दिकची निराशाजनक कामगिरी

हार्दिक गेल्या काही काळापासून सातत्याने निराशाजनक कामगिरी करतोय. हार्दिकला धावांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागतोय. हार्दिकला आयपीएल 2021 पासून ते टी 20 वर्ल्ड कपपर्यंत त्याला आपली छाप सोडता आली नाही. 

दरम्यान हार्दिक सध्या बंगळुरुतीली एनसीएमध्ये कठोर मेहनत घेतोय.  हार्दिकला फिटनेसमुळे बॉलिंगही करता येत नव्हती. त्यामुळे हार्दिकला टीममध्ये बॅट्समन म्हणून संधी देण्यात येत होती. मात्र त्याला बॅटिंगनेही फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.  त्यामुळे हार्दिकने मोठा निर्णय घेतला. या निर्णयाची माहिती त्याने बीसीसीआयला दिली. हार्दिक सध्या फिटनेससाठी वेळ देत आहे.