India vs South Aftica 2nd Test | टीम इंडिया जिंकणार दुसरी कसोटी? पाहा आकडेवारी काय सांगते

  विराटसेनेने आफ्रिकेला दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयासाठी 240 धावांचे आव्हान दिले आहे.   

Updated: Jan 5, 2022, 08:08 PM IST
India vs South Aftica 2nd Test | टीम इंडिया जिंकणार दुसरी कसोटी? पाहा आकडेवारी काय सांगते title=

जोहान्सबर्ग : टीम इंडिया आफ्रिकेत इतिहास रचू शकते. विराटसेनेने आफ्रिकेला दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयासाठी 240 धावांचे आव्हान दिले आहे. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या डावात 266 धावांपर्यंत मजल मारली. मात्र आफ्रिकेकडे 27 धावांची आघाडी असल्याने त्यांना 240 धावांचे आव्हान मिळाले. मात्र विशेष बाब अशी की आफ्रिकेला आतापर्यंत या मैदानात विजयी आव्हान गाठता आलेलं नाही. (ind vs sa 2nd test day 3 team india vs south africa has never been able to chase more than 220 runs at Wanderers ground in Johannesburg)  

टीम इंडियाने पहिल्या डावात 202 तर दुसऱ्या डावात 266 धावा केल्या. तर आफ्रिकेने पहिल्या डावात 229 धावा केल्या. त्यामुळे आफ्रिकेला विजायसाठी 240 धावा करायच्या आहेत.  

आफ्रिकेची वांडरर्समधील कामगिरी

आफ्रिकेला आतापर्यंत वांडरर्समध्ये  220 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करता आलेला नाही. त्यामुळे मालिकेत बरोबरी साधण्यासाठी हा सामना जिंकून हा रेकॉर्ड ब्रेक करण्याचं आव्हान आफ्रिकेसमोर असणार आहे.

आफ्रिकेला हा सामना जिंकायचा असेल, तर त्यांना ऐतिहासिक कामगिकरी करावी लागेल. कारण अजूनही दोन दिवसांचा खेळ बाकी आहे. तसेच ज्या प्रकारे खेळपट्टी आहे, त्या हिशोबाने टीम इंडियाचा  विजय निश्चित समजला जात आहे.  

ऑस्ट्रेलियाने या मैदानातच 2011 मध्ये 310 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. कांगारुंनी 2006 मध्येही 294 धावा करत विजय साकारला होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केला होता.  

टीम इंडिया आघाडीवर 

दरम्यान 3 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. दुसरा सामना जिंकून टीम इंडियाला मालिका जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे. त्यामुळे आता टीम इंडिया हा सामना जिंकून मालिका उंचावणार की आफ्रिका बरोबरी साधणार, हे लवकरच स्पष्ट होईल.