मुंबई : शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) गेल्या काही दौऱ्यांमध्ये आणि देशांतर्गत मालिकेत धमाकेदार कामगिरी केली आहे. शार्दुलने बॉलिंगसह वेळोवेळी बॅटिंगने निर्णायक भूमिका बजावली. त्याच्या या कामगिरीमुळे तो अष्टपैलू खेळाडू म्हणून नावारुपास आला आहे. त्यामुळे शार्दुलची तुलना ही हार्दिक पंड्यासोबत (Hardik Pandya) केली जात आहे. या तुलनेबाबत शार्दुलला काय वाटतं, याबाबत स्वत:ने प्रतिक्रिया दिली आहे. (indian cricket team lord shardul thakur give reaction over to all rounder hardik pandya competition with him)
हार्दिकच्या तुलनेवर काय म्हणाला?
"हार्दिक लवकरच दुखापतीतून सावरेल. आमच्या दोघांच्या बॅटिंग खूप अंतर आहे. हार्दिक 5 किंवा 6 व्या क्रमांकावर बॅटिंग करतो, तर मी 7 किंवा आठव्या. माझी त्याच्याशी कोणतीही स्पर्धा नाही किंवा मला त्याची टीममधील जागा घ्यायची नाहीये", असं शार्दूलने स्पष्ट केलं. शार्दुलने दैनिक जागरणला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने विविध विषयांवर भाष्य केलं.
"मी जितकं हार्दिकला ओळखतो, त्याने मला वेळोवेळी पाठिंबा दिला आहे. तो नेहमीच मला त्याचे अनुभव सांगत असतो. जर वनडे आणि टी 20 मध्ये अधिकाअधिक ऑलराऊंडर येत असतील तर ही चांगली बाब आहे", असंही शार्दूल म्हणाला.