मुंबई : टीम इंडियाचा (Team India) 'हिटमॅन' सलामीवीर रोहित शर्माची (Rohit Sharma) नुकतीच तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. रोहितचे चाहते त्याची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती व्हावी, अशी वाट पाहत होते. रोहितला कर्णधारपदी पोहचेस्तोर फार वेळ लागला. पण रोहित वयानुसार तो खूप दिवस भारतीय संघाचा कर्णधारपदही राहू शकणार नाही. (indian cricket team captain hitman rohit sharma may stepdown on captaincy rishabh pant might be taking charges in future)
रोहित सध्या 34 वर्षांचा आहे. अनेक क्रिकेटपटू वयाच्या या वळणावर निवृत्तीची घोषणा करतात. अशा परिस्थितीत टीम इंडियाकडे असा खेळाडू आधीच आहे जो रोहितनंतर बराच काळ कर्णधार राहू शकतो.
नक्की कारण काय?
रोहितसाठी अधिक काळ कॅप्टन राहणं यासाठीही कठीण आहे, ते म्हणजे त्याचं वय. कारण वयानुसार फिटनेसही साथ देत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत खेळाडू हे निवृत्तीच्या विचारात असतात.
रोहितचा दीर्घ काळासाठी कॅप्टन म्हणून विचार करता येणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत टीम मॅनेजमेंट पुढील कॅप्टन्या शोधात असेल. मात्र कर्णधारपदासाठीचा दावेदार हा टीममध्येच आहे. तो म्हणजे ऋषभ पंत.
कर्णधारपदाचा दावेदार पंतच का?
आता रोहितनंतर कर्णधारपदासाठी ऋषभच दावेदार का, असाही प्रश्न पडला असेल. तर त्यामागील कारणही तसंच आहे. पंत सध्या 24 वर्षांचा आहे. त्याला आयपीएलमध्ये कॅप्टन्सीचा मोजका का होईना पण पुरेसा अनुभव आहे. सोबतच तो विकेटकीपिंगही करतो. त्याच्यात निर्णायक क्षणी सामना आपल्या बाजूने झुकवण्याची क्षमता आहे. त्यामुळे भविष्यात रोहितनंतर कॅप्टन कोण, असा सवाल जेव्हा जेव्हा उपस्थित केला जाईल, तेव्हा तेव्हा पंत हेच नाव क्रिकेट चाहत्यांच्या तोंडी असेल.