IND vs SA ODI: मालिका विजयानंतर कर्णधार शिखर धवनची प्रतिक्रिया; म्हणाला, "पहिल्या सामन्यात..."

मालिकावीर म्हणून मोहम्मद सिराज आणि सामनावीर म्हणून कुलदीप यादवला गौरविण्यात आलं. या मालिका विजयानंतर कर्णधार शिखर धवननं आपलं मत व्यक्त केलं.

Updated: Oct 11, 2022, 07:41 PM IST
IND vs SA ODI: मालिका विजयानंतर कर्णधार शिखर धवनची प्रतिक्रिया; म्हणाला, "पहिल्या सामन्यात..." title=

India Won Series Against South Africa: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तीन सामन्यांची मालिका टीम इंडियाने 2-1 नं खिशात घातली. तिसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय गोलंदाजांनी सार्थकी घातला. आफ्रिकेचा संपूर्ण संघ 99 या धावसंख्येवर गारद झाला आणि विजयासाठी 100 धावांचं आव्हान मिळालं. भारतानं हे आव्हान 7 गडी आणि 185 चेंडू राखून पूर्ण केलं. मालिकावीर म्हणून मोहम्मद सिराज आणि सामनावीर म्हणून कुलदीप यादवला गौरविण्यात आलं. या मालिका विजयानंतर कर्णधार शिखर धवननं आपलं मत व्यक्त केलं.

"मला माझ्या सहकाऱ्यांचा अभिमान आहे, ते ज्या पद्धतीने खेळले. आम्ही पहिल्या सामन्यात ढासळलो होतो, काही झेल सोडले, पण आम्ही कधीही दबावात आलो नाही. मी माझ्या संघासाठी चांगली कामगिरी करत राहण्याचा प्रयत्न करेन. अशा कठीण खेळपट्ट्यांवर सहकाऱ्यांनी चांगला परफॉर्मन्स केलं. आज गोलंदाजी जबरदस्त होती.", असं कर्णधार शिखर धवन यानं सांगितलं.

दक्षिण आफ्रिका संघ- जनेमन मलान, क्विंटन डिकॉक, रीजा हेंड्रिक, एडन मारक्रम, हेनरिच क्लासेन, डेविड मिलार, अँडिले फेहलुक्वायो, मार्को जानसेन, जॉर्न फॉर्चुन, अनरिच नोर्तजे, लुंगी एनगिडी

भारत संघ- शिखर धवन, शुभमन गिल, इशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, शार्दुल ठाकुर, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, कुलदीप यादव, आवेश खान, मोहम्मद सिराज