U19 World cup : मुलींनी करून दाखवलंच! न्यूझीलंडला नमवत टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव करत फायनलच्या सामन्यात धडक मारली आहे.

Updated: Jan 27, 2023, 04:10 PM IST
U19 World cup : मुलींनी करून दाखवलंच! न्यूझीलंडला नमवत टीम इंडियाची फायनलमध्ये धडक title=

IND-W vs NZ-W: अंडर-19 वुमेंस टी-20 (Under-19 Women's T20 WC 2023) वर्ल्डकपमध्ये शेफाली वर्माच्या (Shafali Verma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने या स्पर्धेची फायनल (Under-19 Women's T20 WC 2023 Final) गाठली आहे. शुक्रवारी महिला टीम इंडियाने न्यूझीलंडच्या महिलांचा पराभव करत फायनलच्या सामन्यात धडक मारली आहे. 8 विकेट्सने न्यूझीलंडला नमवत टीम इंडियाने फायनलचं तिकीट मिळवलं आहे.

श्वेता सेहरावतचा जलवा कायम

सेमीफायनलच्या सामन्यातही टीम इंडियाची ओपनर श्वेता सेहरावतचा उत्तम खेळ पहायला मिळाला. सेमीफायनलच्या सामन्यातंही तिने अर्धशतक झळकावून टीमला विजय मिळवून दिला आहे. श्वेताने 45 बॉल्समध्ये 61 रन्स करत तुफान फलंदाजी केली. टीम इंडियाने अवघ्या 14.2 ओव्हरमध्ये न्यूझीलंडने दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं आहे.

टीम इंडियाकडून सोम्या तिवारीने 22 रन्स तर कर्धणार शेफाली वर्माने 10 रन्सची खेळी केली. या विजयासह टीम इंडियाने वर्ल्डकपच्या फायनल सामन्याचं तिकीट पटकावलं आहे.

न्यूझीलंडची फलंदाजी गडगडली

न्यूझीलंडच्या महिलांना आज फलंदाजीमध्ये फारसा चांगला खेळ करता आला नाही. न्यूझीलंडकडून Georgia Plimmer हिने सर्वाधिक म्हणजेच 35 रन्सची खेळी केली. तर विकेटकीपर फलंदाज Izzy Gaze हिने 22 बॉल्समध्ये 26 तर कर्णधार Izzy sharp ने 13 रन्स केले. 10 विकेट्स गमावत न्यूझीलंडच्या महिलांना केवळ 107 रन्सपर्यंत मजल मारता आली. आणि टीम इंडियाला किवींनी 108 रन्सचं टारगेटं दिलं होतं.