न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा विजय, मालिकाही जिंकली

वनडे मालिकेनंतर आता टी-२० मालिकेतही भारताने न्यूझीलंडला हरवलेय. अखेरच्या आणि तिसऱ्या निर्णायक सामन्यात भारताने ६ धावांनी विजय मिळवला. यासोबतच तीन सामन्यांची मालिका भारताने २-१ ने खिशात घातली. 

Updated: Nov 7, 2017, 11:07 PM IST
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा विजय, मालिकाही जिंकली title=

तिरुअनंतपुरम : वनडे मालिकेनंतर आता टी-२० मालिकेतही भारताने न्यूझीलंडला हरवलेय. न्यूझीलंडविरुद्धचा अखेरचा आणि तिसरा सामना अटीतटीचा झाला. या सामन्यात भारताने ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. या विजयासोबतच भारताने न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची मालिका २-१ने खिशात घातली. 

न्यूझीलंडसमोर विजयासाठी ६८ धावांचे आव्हान होते. मात्र न्यूझीलंडला ८ षटकांत केवळ ६ बाद ६१ धावा करता आल्या. जसप्रीत बुमराहने दोन तर भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली

तब्बल ३० वर्षानंतर खेळवण्यात येत असलेल्या स्टेडियमवर पावसाने खोडा घातला आणि सामना उशिराने सुरु झाला. ८ षटकांचा सामना खेळवण्यात आला.

न्यूझीलंडने टॉस जिंकला आणि भारताला फलंदाजीस बोलावले. भारताने ८ षटकांत ५ गडी गमावताना ६७ धावा केल्या. भारताकडून एकाही फलंदाजांला चांगला कामगिरी करता आली नाही.