भारतानं टॉस जिंकला, इतिहास घडवण्यासाठी 'विराट'ब्रिगेड मैदानात

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारतानं टॉस जिंकला आहे.

Updated: Feb 10, 2018, 04:17 PM IST
भारतानं टॉस जिंकला, इतिहास घडवण्यासाठी 'विराट'ब्रिगेड मैदानात title=

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारतानं टॉस जिंकला आहे. टॉस जिंकून भारतानं पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलाय. या मॅचमध्ये भारतानं एक बदल केला आहे. केदार जाधवच्याऐवजी श्रेयस अय्यरला टीममध्ये संधी देण्यात आली आहे.

पहिल्या तीन वनडेमध्ये भारताचा विजय झाल्यानंतर आता चौथी वनडे जिंकून सीरिज खिशात टाकण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरत आहे. याआधी भारतानं कधीच दक्षिण आफ्रिकेमध्ये वनडे सीरिज जिंकलेली नाही. याआधी २०१०-१ मध्ये महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात २-१ ने पुढे असतांना देखील नंतर भारताचा ३-२ ने पराभव झाला होता.

भारताचे स्पिनर्स युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. पहिल्या तीन मॅचमध्ये ३० पैकी २१ विकेट या दोघांनी घेतल्या आहेत. तर विराट कोहलीनंही मागच्या मॅचमध्ये १६० रन्सची खेळी केली होती. पण रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याचा फॉर्म भारतासाठी चिंतेची बाब असेल.

एबी डिव्हिलियर्सचं कमबॅक

बोटाच्या दुखापतीमुळे पहिल्या तीन वनेडला मुकलेल्या एबी डिव्हिलियर्सनं या मॅचमध्ये कमबॅक केलं आहे. फॅप डुप्लेसिस आणि क्विंटन डीकॉक मात्र अजूनही टीममध्ये नाहीत.

अशी आहे भारतीय टीम

रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, एम.एस.धोनी, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह 

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा