IND vs WI 4th T20I: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-ट्वेंटी मालिकेतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून पराभव केला. त्यामुळे आता भारताने मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात कुलदीप (Kuldeep Yadav) आणि अर्शदीपच्या (Arshdeep Singh) धारदार गोलंदाजीसह शुभमन गिल (Shubman Gill) आणि यशस्वी जयस्वालची (Yashasvi Jaiswal) दमदार फलंदाजी पहायला मिळाली. चौथा सामना जिंकल्याने आता टीम इंडियाने मालिकेत लाज राखली आहे. त्यामुळे आता आगामी सामना दोन्ही संघासाठी अतितटीचा असेल. (India win 4th T20I by 9 wickets against West Indies)
सामन्यात वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना 179 धावांचे लक्ष्य दिलं होतं, जे भारताने तीन ओव्हर शिल्लक असताना पूर्ण केले. भारताकडून यशस्वी जयस्वालने 51 चेंडूत 84 धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 3 शानदार षटकारही मारले. तर सलामीवीर शुभमन गिलने देखील त्याला मोलाची साथ दिली. शुभमनने 47 बॉलमध्ये 77 धावांची वादळी खेळी केली. तर शुभमन आऊट झाल्यावर तिलक वर्माने जलवा दाखवत 7 धावा केल्या आणि भारताला विजय पक्का केला.
up for Shubman Gill
up for Yashasvi Jaiswal - his first in T20Is #TeamIndia on a roll here in chase!
Follow the match https://t.co/kOE4w9Utvs#WIvIND pic.twitter.com/gJc3U9eRBR
— BCCI (@BCCI) August 12, 2023
प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजची सुरूवात चांगली झाली. मात्र, अर्शदीपने दांड्या उडवण्यास सुरूवात केली. अर्शदीपने दोन्ही सलामीवीरांना तंबुत पाठवलं. त्यानंतर सुरू झाला कुलदीपचा जलवा, कुलदीपने दोन दणक्यात विकेट काढले अन् टीम इंडियाला सामन्यात खेचून आणलं. त्यानंतर हेटमायरने तुफानी खेळी करत 39 बॉलमध्ये 61 धावा खेचल्या. त्यामुळे वेस्ट इंडिजला 178 धावा उभारता आल्या.
वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): ब्रँडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (WK), रोव्हमन पॉवेल (C), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, अकेल होसेन, ओबेद मॅककॉय
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (C), संजू सॅमसन (WK), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.