मुंबई : झिम्बाब्वे विरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने (Team India) 5 विकेटस राखून विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार टीम इंडियाचा संजू सॅमसन ठरला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 ने खिशात घातली. या विजयासह सामन्यातील एक किस्सा खुप चर्चेत आला आहे. हा किस्सा ईशान किशन (Ishan Kishan) संदर्भातला आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. नेमकं या व्हिडिओत काय झालंय ते जाणून घेऊयात.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्या दरम्यान ईशान किशनची (Ishan Kishan) एक कृती टीम इंडियाला खुप महागात पडली होती. मात्र त्या खेळाडूचं नशीब चांगलं असल्याने हा खेळाडू थोडक्यात बचावला आहे.
व्हिडिओत काय?
दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान टीम इंडियाचा क्रिकेटर ईशान किशनवर (Ishan Kishan) त्याचा सहकारी खेळाडू अक्षर पटेलला चिडलेला पाहायला मिळाला. त्याचं झालं असं की झिम्बाब्वेच्या डावाच्या 28व्या ओव्हर दरम्यान टीम इंडियाचा अष्टपैलू दीपक हुडा गोलंदाजी करायला आला होता. दीपक हुडाच्या ओव्हरमधला दुसरा बॉल जेव्हा डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात क्षेत्ररक्षण करत असलेल्या ईशान किशनकडे (Ishan Kishan) पोहोचला. तेव्हा त्याने फिल्डींग करून बॉल थ्रो केला. हा बॉल थेट अक्षर पटेलच्या (Akshar Patel) डोक्यावर लागणार होता. मात्र अक्षर पटेलने स्वत:ला सावरत वाचवले.
— Richard (@Richard10719932) August 20, 2022
ईशान किशनच्या (Ishan Kishan) या थ्रोनंतर अक्षर पटेल मागे वळून त्याच्याकडे रागाने पाहू लागला. मात्र, ईशान किशनने लगेच हात वर करून अक्षर पटेलकडे माफी मागण्याचा इशारा केला. जर चेंडू अक्षर पटेलच्या (Akshar Patel) डोक्याला लागला असता तर तो गंभीर जखमी झाला असता. त्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला होता.मात्र थोडक्यात हा अपघात टळला आणि सर्वांच्या जीवात जीव आला.