IND vs SL: हॉटस्टारवर नाही दिसणार भारत वि. श्रीलंकेचे सामने? जाणून घ्या कुठे पाहता येणार सामने?

IND vs SL: भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्ध तीन टी-20 आणि तीन वनडे सामन्यांची सिरीज खेळणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात 27 जुलैपासून टी-20 सिरीज खेळवली जाणार आहे.

सुरभि जगदीश | Updated: Jul 22, 2024, 05:36 PM IST
IND vs SL: हॉटस्टारवर नाही दिसणार भारत वि. श्रीलंकेचे सामने? जाणून घ्या कुठे पाहता येणार सामने? title=

IND vs SL: झिम्बाव्बेच्या दौऱ्यानंतर टीम इंडिया आता श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी टीम इंडियाला 3 टी-20 सामने आणि 3 वनडे सामने खेळायचे आहेत. यावेळी दोन्ही फॉर्मेटसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टी-20 आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वनडे सिरीज खेळवली जाणार आहे. दरम्यान या सिरीज कुठे पाहता येणार हा चाहत्यांना मोठा प्रश्न आहे. 

भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्ध तीन टी-20 आणि तीन वनडे सामन्यांची सिरीज खेळणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात 27 जुलैपासून टी-20 सिरीज खेळवली जाणार आहे. त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान 2 ऑगस्टपासून वनडे सिरीजचे सामने होतील. दरम्यान या दौऱ्यातील भारत-श्रीलंका सिरीज स्टार नेटवर्क किंवा डिस्ने हॉटस्टारवर थेट दाखवण्यात येणार नाही. तसंच त्याचे स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर होणार नाही.

कुठे पाहता येणार भारत विरूद्ध श्रीलंका यांचे सामने

भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामधील होणारे टी-20 सामने आणि वनडे सामन्यांच्या सिरीजचं प्रसारण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. यावेळी Sony Ten 5 वर इंग्रजीमध्ये आणि Sony Ten 3 वर हिंदीमध्ये करण्यात येणार आहे. याशिवाय या सिरीजचं लाईव्ह स्ट्रिमींग Sony liv अॅपवर पण करण्यात येणार आहे. 

किती वाजता सुरु होणार सामने

भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील टी-20 सामने संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहेत. यावेळी पहिली T20 27 रोजी, दुसरी T20 28 रोजी आणि शेवटचा T20 सामना 30 जुलै रोजी खेळवला जाईल. हे तीन टी-20 सामने पल्लेकेलेमध्ये खेळवले जाणार आहेत. तर वनडे सिरीजमधील सामने भारतीय वेळेनुसार, दुपारी 2 वाजता खेळवले जाणार आहेत. 2, 4 आणि 7 ऑगस्ट रोजी वनडे सामने होणार आहेत. तिन्ही वनडे सामने श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये येथे खेळवले जातील. हे सामने प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल.

वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ 

रोहित शर्मा (C), शुभमन गिल (VC), विराट कोहली, केएल राहुल (WK), ऋषभ पंत (WK), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.

टी-ट्वेंटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ 

सूर्यकुमार यादव (C), शुबमन गिल (VC), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (WK), संजू सॅमसन (WK), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोनी, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.