India vs Sri Lanka, 2nd T20I | टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला कोरोना, दुसरा टी 20 सामना स्थगित

टीम इंडियाच्या (Team India) स्टार खेळाडूला कोरोनाची (Covid 19) लागण झाल्याने दुसरा सामना (India vs Sri Lanka 2nd T20I) स्थगित करण्यात आलाय. 

Updated: Jul 27, 2021, 04:29 PM IST
India vs Sri Lanka, 2nd T20I | टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला कोरोना,  दुसरा टी 20 सामना स्थगित  title=

कोलंबो : टीम इंडियाचा (Team India) स्टार अष्टपैलू खेळाडू कृणाल पंडल्याला (Krunal Pandya) कोरोनाची लागण झाली आहे. कृणालचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याचा थेट परिणाम हा श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यावर (India vs Sri Lanka  2nd T20I) झालाय. कृणाल पॉझिटिव्ह असल्याने ही दुसरी मॅच स्थगित करण्यात आली आहे. (India vs Sri Lanka 2nd T20I  match postponed due to all rounder krunal Pandya tested covid positive) 

 

कृणालला कोरोना, सूर्या आणि पृथ्वी गॅसवर?

कृणालला कोरोना झाल्याने टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. टीम इंडियाच्या मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडियाचे तीन स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने त्यांना या कसोटी मालिकेला मुकावे लागले आहे. दुखापतीमुळे शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान यांना मुकावे लागलेय. त्यामुळे यांच्या जागी मुंबईकर सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. मात्र आता कृणालला कोरोना झाल्याने या दोघांच्या इंग्लंड दौऱ्याबाबत सांशकता निर्माण झालीय.

दुसरा सामना केव्हा?

कृणालला कोरोना झाल्याने टीम इंडिया आणि श्रीलंकेच्या खेळाडूंना आयसोलेट करण्यात आलेय. या उभयसंघातील सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी केली जाणार आहे. सर्व खेळाडूंची टेस्ट नेगिटव्ह आली, तर हा स्थगित केलेला दुसरा सामना बुधवारी 28 जुलैला खेळवला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

मालिकेत 1-0 ने आघाडीवर

टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. दुसरा सामना जिंकून भारताला टी 20 मालिकाही जिंकण्याची संधी आहे. तर श्रीलंकेला मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा दुसरा सामना महत्वाचा असणार आहे.