IND vs SA test: रहाणे, पुजारा पुन्हा फ्लॉप, एकत्र टेस्ट मॅच खेळण्याची शेवटची वेळ?

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचं नशीब बदलण्याचं मात्र नाव काही घेत नाही

Updated: Jan 3, 2022, 07:01 PM IST
IND vs SA test: रहाणे, पुजारा पुन्हा फ्लॉप, एकत्र टेस्ट मॅच खेळण्याची शेवटची वेळ? title=

Cheteswar Pujara-Ajinkya Rahane: नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. नव्या वर्षात टीम इंडिया (Team India) नव्या कर्णधारासह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी (Ind vs SA 2nd Test) सामन्यासाठी मैदानात उतरली आहे. पण भारताचे सर्वात अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांचं नशीब बदलण्याचं मात्र नाव काही घेत नाही. 

नव्या वर्षाची सुरुवात या दोन्ही दिग्गजांसाठी खराब फॉर्मने झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग (Johannesburg Test Match) इथं खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या डावात पुजारा आणि रहाणे स्वस्तात बाद झाले. पुजारा 33 चेंडूत 3 धावा करून बाद झाला, तर रहाणे खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला.

पहिल्या कसोटीतही फ्लॉप 
सेंच्युरियन कसोटीतही चेतेश्वर पुजारा अपयशी ठरला होता. मात्र रहाणेने ४८ धावांची खेळी करत पुन्हा फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले होते. पण दुसऱ्या कसोटीत तो खातंही उघडू शकला नाही. या दोन फलंदाजांचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय बनला आहे. 

जोहान्सबर्ग कसोटीच्या पहिल्या डावातील खराब कामगिरीनंतर, युजर्सनी आता सोशल मीडियावर रहाणे आणि पुजारा शेवटच्या वेळी एकत्र कसोटी सामना खेळत आहेत का, असे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.

अजिंक्य रहाणे गोल्डन डकचा शिकार
जोहान्सबर्ग कसोटीत अजिंक्य रहाणे शून्यावर बाद झाला. कसोटी सामन्यात पहिल्याच चेंडूवर शुन्यावर बाद होण्याची रहाणेची ही पहिलीच वेळ आहे (career's first golden duck in Johannesburg Test). रहाणेला गेल्या १९ कसोटी डावांत केवळ एकच अर्धशतक झळकावता आलं आहे. 2020 नंतर त्याने एकही शतक झळकावलेलं नाही. रहाणेची ही कामगिरी पाहता टीम इंडियात त्याची जागा नक्कीच धोक्यात आली आहे.

सुनील गावसकर काय बोलले
भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी पुजारा आणि रहाणेकडे कारकीर्द वाचवण्यासाठी आणखी एक इनिंग असल्याचं म्हटलं आहे.  हे पुजारा आणि रहाणए ज्या पद्धतीने बाद झाले, त्यावरून असं म्हणता येईल की, दोघांना कसोटी कारकीर्द वाचवण्यासाठी शेवटची संधी आहे, असं कॉमेंट्रीदरम्यान गावसकर यांनी म्हटलं. 

शतक ठोकूनही श्रेयस अय्यरला संधी नाही
न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीत श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) शतक झळकावलं होते.  दमदार खेळीने कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर श्रेयस अय्यरला भारतीय संघात संधी देण्यात आली नाही.