INS Vs SA ODI : Team India मध्ये धुसफूस! कर्णधारपद गमावल्यानंतर विराट निराश, एकदिवसीय मालिकेतूनही काढता पाय

संघात नेमकं काय सुरुए.... 

Updated: Dec 14, 2021, 12:47 PM IST
INS Vs SA ODI : Team India मध्ये धुसफूस! कर्णधारपद गमावल्यानंतर विराट निराश, एकदिवसीय मालिकेतूनही काढता पाय  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा सध्या बहुविध कारणांमुळे चर्चेत आला आहे. मुख्य म्हणजे या साऱ्यामध्ये भारतीय संघाच्याच अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. या अडचणी पुढे जाऊन संघाच्या खेळावरही मोठा प्रभाव टाकण्याची दाट शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे.

पहिल्या कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी असणाऱ्या रोहित शर्मानं यावेळी दुखापतग्रस्त असल्याचं सांगत कसोटीतून माघार घेतली आहे. आता म्हणे विराट रोहलीनंही एकदिवसीय क्रिकेटमधून काढता पाय घेतला आहे.

BCCI नं विराटकडून संघाचं कर्णधापद काढून घेतल्यानंतर त्यानं हा निर्णय घेतल्याचं कळत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार विराटनं क्रिकेट बोर्डाकडे याची पूर्वकल्पना दिली होती. 11 जानेवारीला आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस असतो, ज्यासाठी आपल्याला कुटुंबासमवेत असावं लागणार असल्याचं कारण त्यानं दिलं होतं.

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये तिसरा कसोटी सामना 11 जानेवारीला खेळला जाणार आहे. हा विराट कोहलीचा 100 वा कसोटी सामना असणार आहे. ज्यानंतर सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेच्या वेळी विराट कुटुंबाला वेळ देणार असल्याचीच दाट शक्यता आहे.

विराटला कर्मधारपदावरून हटवल्यानंतर आणि रोहितच्या हाती सर्व जबाबदारी दिल्यानंतर अशा चर्चा समोर येणं ही संघासाठी चांगली बातमी नाही.

दरम्यान एकिकडे संघातून रोहित शर्मा कसोटी सामन्यासाठी बाहेर झाल्यामुळं त्याच्याजागी गुजरातचा फलंदाज प्रियंक पंचाल याची वर्णी लागली आहे.

दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय संघाला तीन कसोटी सामन्यांची मालिका आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. तेव्हा आता संघात पुढे नेमकं काय घडणार याकडेच क्रिकेट बोर्ड आणि क्रीडारसिकांचं लक्ष लागलं आहे.