IND vs PAK : चाहत्यांसाठी मोठी बातमी, 15 वर्षांनंतर भारत-पाकिस्तान कसोटी सामना होणार पण...

IND vs PAK Test Match:  भारत आणि पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. 15 वर्षांनंतर दोन्ही संघांमध्ये कसोटी सामने खेळवले जाऊ शकतात. या सामन्याचे आयोजन करण्यासाठी एक देशही पुढे आला आहे. 

Updated: Dec 29, 2022, 10:58 AM IST
IND vs PAK : चाहत्यांसाठी मोठी बातमी, 15 वर्षांनंतर भारत-पाकिस्तान कसोटी सामना होणार पण... title=

IND vs PAK Test Match At MCG: जागतिक क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्धी असणारे भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) 15 वर्षानंतर एकमेंकाशी भिडणार असल्याची माहिती मिळत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमा तणावामुळे (IND vs PAK) अनेक दिवसांपासून कोणतीही क्रिकेट मालिका झालेली नाही. गेल्या 15 वर्षांपासून दोन्ही संघांमध्ये एकही कसोटी सामना खेळला गेला नाही. आयसीसीच्या मोठ्या टूर्नामेंटमध्ये हे दोघे अनेकदा एकमेकांशी भिडतात. मात्र, आता भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात कसोटी सामना आयोजित केल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर आमनेसामने येणार हे क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी गोष्ट असेल. विशेष म्हणजे दोन्ही संघांमध्ये कसोटी सामना आयोजित करण्यासाठी एक देश पुढे आला आहे.

वाचा : ट्विटर डाऊन, डेस्कटॉप आणि ॲपवर हजारो युझर्सना ट्वीट्स करण्यात येतेय समस्या 

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, मेलबर्न क्रिकेट क्लब आणि व्हिक्टोरियन सरकारने भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील कसोटी सामन्याचे आयोजन करण्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे अनौपचारिक चौकशी केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑक्टोबरमध्ये खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषक सामन्यातील यशानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी SEN रेडिओवर बोलताना, MCC चे मुख्य कार्यकारी स्टुअर्ट फॉक्स यांनी खुलासा केला की, क्लब आणि व्हिक्टोरियन सरकारने तटस्थ ठिकाणी कसोटी आयोजित करण्याबद्दल CA कडे चौकशी केली होती.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने दिली 'ही' माहिती

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने ईएसपीएन क्रिकइन्फोला सांगितले की, 'दोन्ही देश कशावर सहमत आहेत यावर ते अवलंबून असेल. पण भारत-पाकिस्तान यांच्यात तटस्थ ठिकाणी कसोटी खेळली गेली, तर ती ऑस्ट्रेलियात आयोजित करण्याची संधी आम्हाला नक्कीच आवडेल. विश्वचषक स्पर्धेसाठी येथील दोन्ही संघांचे समर्थक आश्चर्यकारक होते आणि त्यातील बहुतांश चाहते ऑस्ट्रेलियात राहतात. अशा परिस्थितीत दोन्ही संघांमधील कसोटी सामने खेळवण्याचा अंतिम निर्णय बीसीसीआय आणि पीसीबी घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.