India vs Pakistan: स्वस्तात आऊट झाल्याने Rohit Sharma ट्रोल, लोकांकडून अशा कमेंट

Rohit Sharma रोहित शर्माने पुन्हा केलं चाहत्यांना निराश, सोशल मीडियावर होतोय ट्रोल.

Updated: Oct 23, 2022, 05:31 PM IST
India vs Pakistan: स्वस्तात आऊट झाल्याने Rohit Sharma ट्रोल, लोकांकडून अशा कमेंट title=

Rohit Sharma : T20 world cup 2022 मध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगत आहे. ज्यामध्ये भारतीय कर्णधार पुन्हा एकदा अयशस्वी ठरलाय. केएल राहुल बाद झाल्यानंतर रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती पण तो देखील लवकर पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताचा संघ मोठ्या संकटात सापडला आहे, संघाने महत्त्वाचे विकेट स्वस्तात गमावले आहेत.

रोहित शर्माने 7 बॉलमध्ये फक्त 4 रन केले. तर केएल राहुलने 8 बॉलमध्ये 4 रन केले. सुर्यकुमार यादवने 10 बॉलमध्ये 15 रन तर अक्षर पटेलने 3 बॉलमध्ये 2 रन केले. विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने भारताची बाजु सांभाळली.

रोहित शर्मा ट्रोल

भारताचा सलामीवीर म्हणून क्रीजवर आलेल्या रोहित शर्माकडून आजच्या महत्त्वाच्या सामन्यात मोठी खेळी अपेक्षित होती. खेळपट्टी समजून रोहितने संथ सुरुवात केली पण पुन्हा एकदा त्याची बॅट शांत झाली. चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोहित शर्माने अतिशय खराब शॉट खेळत हॅरिस रौफच्या चेंडूवर आपली विकेट गमावली. स्लीपमध्ये उभा असलेल्या इफ्तिखार अहमदने कॅच घेत रोहित शर्माला आऊट केलं. स्वस्तात विकेट गमावल्यानंतर रोहित शर्मा सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे.