गेमचेंजर ठरलेल्या हार्दिक पांड्याबाबत शोएब अख्तरचं मोठं विधान; म्हणाला...

भारत हरला असता पण...; शोएब अख्तरचं वक्तव्य चर्चेत 

Updated: Aug 29, 2022, 08:00 PM IST
गेमचेंजर ठरलेल्या हार्दिक पांड्याबाबत शोएब अख्तरचं मोठं विधान; म्हणाला... title=

Asia cup 2022 Ind vs Pak : भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्यामध्ये हार्दिक पांड्या किंगमेकर ठरला. भारताच्या विकेट्स जात असताना हार्दिकने एक बाजू लावून धरत सामन्याच्या शेवटच्या षटकापर्यंत मैदानावर थांबत विजय साकार केला. अटीतटीच्या झालेल्या सामन्याची चर्चा आहे. मात्र अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने पांड्याबाबत मोठं विधान केलं आहे.
 
दोन्ही संघ जिंकण्याचा प्रयत्न करत होते मात्र भारत सामना जिंकण्यामध्ये यशस्वी झाला. भारताने हा सामना हरला असता मात्र हार्दिक पांड्याने तसं होऊ दिलं नाही. बाबर आझमने तीन नंबरला यायला हवं होतं, असं शोएब अख्तर म्हणाला. अख्तर आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलत होता.

हार्दिक पांड्याने पाकिस्तानविरुद्धच्या मॅचविनिंग कामगिरीनंतर सोशल मीडियावर त्याचे खूप कौतुक केलं जात आहे. 2018 च्या त्याच्या प्रदीर्घ दुखापतीनंतर तो ज्याप्रकारे परतला, त्यावरून त्याची प्रशंसा होत आहे. हार्दिकनेही स्वतःचे दोन वेगवेगळे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.

दरम्यान, 2022 सालामध्ये हार्दिकच्या नशिबात मोठा बदल घडवून आणला आहे. नवीन आयपीएल फ्रँचायझी गुजरात टायटन्सने त्याला त्यांच्या संघाचा कर्णधार बनवले. इथून जगाला नवा हार्दिक पांड्या पाहायला मिळाला आहे.