Ind vs NZ : भारतीय संघ 219 धावांवर ढेपाळला; वॉशिंग्टन सुंदरची अर्धशतकी खेळी

Ind vs NZ 3rd ODI Match : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली होती. मात्र भारतीय संघाला 47.3 षटकांमध्ये केवळ 219 धावा करता आल्या आहेत.

Updated: Nov 30, 2022, 11:38 AM IST
Ind vs NZ : भारतीय संघ 219 धावांवर ढेपाळला; वॉशिंग्टन सुंदरची अर्धशतकी खेळी title=

Ind vs NZ 3rd ODI Match : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामना क्राईस्टचर्च येथे खेळवला जातोय. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने (kane williamson) नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कर्णधार शिखर धवनच्या (shikhar dhawan) नेतृत्वाखाली भारतीय संघ 219 धावांवर ढेपाळला. न्यूझीलंडला हा सामना जिंकण्यासाठी आता 220 धावांची गरज आहे. भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतक झळकावले आहे. न्यूझीलंडचे फलंदाज अॅडम मिल आणि डॅरिल मिशेल यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले आहेत.

भारतीय संघ 47.3 षटकांतच सर्वबाद होऊन 219 धावांवर आटोपला. न्यूझीलंडला विजयासाठी 220 धावांचे लक्ष्य आता गाठायचे आहे. वॉशिंग्टन सुंदरने (washington sundar) सर्वाधिक 51 धावांचे योगदान दिले. सुंदरने 64 चेंडूंच्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याच्याशिवाय श्रेयस अय्यरने 49 धावा केल्या.

भारताची इनिंग

भारताला पहिला धक्का शुबमन गिलच्या रूपाने बसला. गिलने 22 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. अॅडम मिलने त्याला झेलबाद केले. त्यानंतर कर्णधार शिखर धवन 28 धावा करून बाद झाला. धवननंतर ऋषभ पंत अवघ्या 10 धावा करून बाद झाला. पंतला डॅरिल मिशेलने ग्लेन फिलिप्सकरवी झेलबाद केले. सूर्यकुमार यादवही स्वस्तात बाद झाला. सूर्यकुमारने केवळ 4 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही. तो 49 धावांवर बाद झाला. अय्यर बाद झाल्यानंतर सुंदरने सामना सांभाळला. सुंदरसोबत मैदानावर असलेला दिपक हुडाही 25 चेंडूत 12 धावा करुन बाद झाला. त्यानंतर मिचेलने दिपक चहरला 12 धावांवर बाद केले. युझवेंद्र चहल 8 धावा करून न्यूझीलंडचा आठवा बळी ठरला. त्यानंतर अर्शदीपच्या रुपाने भारतीय संघाला नववा धक्का बसला. शेवटी 51 धावा करुन वॉशिंग्टन सुंदरही बाद झाला.