IND vs NZ: गुटखा खाणाऱ्या व्यक्तीची वासीम जाफरने घेतली फिरकी, म्हणाला....

कानपूर इथे सामना पाहण्यासाठी आलेला एक तरुण गुटखा खात फोनवर बोलत होता

Updated: Nov 26, 2021, 01:27 PM IST
IND vs NZ: गुटखा खाणाऱ्या व्यक्तीची वासीम जाफरने घेतली फिरकी, म्हणाला.... title=

कानपूर: भारत विरुद्ध न्यूझीलंड 2 कसोटी सीरिजपैकी पहिला सामना कानपूर इथे खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसरा दिवस सुरू आहे. पहिल्या दिवस अखेर टीम इंडियाने 4 गडी गमावून 258 धावा केल्या होत्या. पहिलाच दिवस एक सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमुळे तुफान चर्चेत आला. हा फोटो होता स्टेडियममध्ये गुटखा खाणाऱ्या तरुणाचा. 

कानपूर इथे सामना पाहण्यासाठी आलेला एक तरुण गुटखा खात फोनवर बोलत होता. त्याचा स्वॅग पाहून सोशल मीडियावर खूप चर्चे होत आहे. तर माजी क्रिकेटर वासीम जाफर यांनी या तरुणाची सोशल मीडियावर चांगलीच फिरकी घेतली आहे. 

कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी स्टेडियममध्ये बसून गुटखा खाणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.

वासीम जाफरने घेतली फिरकी

हा व्हिडीओ पाहून टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू वासीम जाफर फिरकी घेण्यापासून स्वत: ला रोखू शकले नाहीत. त्याने एक मजेदार मीम शेअर केलं आहे. हेरा फेरीमधील मीम शेअर केलं आहे. राजू भाई आणि बाबूराव यामध्ये बोलताना दिसत आहेत. तोंडातून सुपारी काढून बोल रे बाबा! असं ते या फोटोमध्ये म्हणताना दिसत आहे.