IND vs ENG : ऐतिहासिकच! एजबॅस्टन कसोटीत 3 'डोळे' असलेला खेळाडू मैदानात उतरणार

क्रिकेट विश्वात नेहमीच नवीनवीन प्रयोग केले जातात.

Updated: Jun 30, 2022, 08:48 PM IST
IND vs ENG : ऐतिहासिकच! एजबॅस्टन कसोटीत 3 'डोळे' असलेला खेळाडू मैदानात उतरणार title=

मुंबई : क्रिकेट विश्वात नेहमीच नवीनवीन प्रयोग केले जातात. आता असाच एक प्रयोग उद्या 1 जूलैपासून होणाऱ्या इग्लंड आणि टीम इंड़ीया यांच्य़ातील कसोटी सामन्यात करण्यात येणार आहे. या नवीन प्रयोगाची खुप चर्चा रंगली आहे.  

'या' खेळाडूच्या माथ्यावर तिसरा डोळा
कसोटी सामन्यात पहिल्यांदाच एखादा खेळाडू हेल्मेटमध्ये कॅमेरा लावून क्षेत्ररक्षण करताना मैदानात उतरणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात १ जुलैपासून होणाऱ्या एजबॅस्टन कसोटी सामन्यात हा प्रयोग होणार आहे. इंग्लंडचा ऑली पोप हा हेल्मेटमध्ये कॅमेरा लावून क्षेत्ररक्षण करताना दिसणार आहे. 

नवीन प्रयोग काय?
स्काय स्पोर्ट्स हे नवीन डिव्हाइस लॉन्च करणार आहे. हे क्रिकेट कव्हरेजसाठी केले जात आहे. टीम इंडियाविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये  इंग्लंडचा खेळाडू ऑली पोप त्याच्या हेल्मेटमध्ये हा कॅमेरा घेऊन फिल्डिंग करताना दिसणार आहे.

हा कॅमेरा आवाज रेकॉर्ड करेल का?
ऑली पोप जेव्हा शॉर्ट लेगमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसेल तेव्हाच हा कॅमेरा लावेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) यांनीही या नवीन उपक्रमाला मान्यता दिली आहे. मात्र, या कॅमेऱ्यात कोणताही आवाज रेकॉर्ड होणार नाही. अशा परिस्थितीत खेळाडू आपापसात काय बोलतात, हे कळणार नाही. आवाजासाठी स्टंप माइकचा वापर आधीच केला गेला असला तरी.

स्काय स्पोर्ट्सने गेल्या वर्षी झालेल्या 'द हंड्रेड' स्पर्धेच्या पहिल्या सत्रात या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला होता. ट्रेंट रॉकेट्स संघाचा यष्टिरक्षक टॉम मूर्स कॅमेरा लावून मैदानात उतरला होता. यावेळी या कॅमेरातून क्रिकेटचे एक वेगळे दृष्य पाहता आले होते. 

इंग्लंड क्रिकेट संघाला टीम इंडियाविरुद्ध पाचवा कसोटी सामना त्यांच्याच मैदानात खेळायचा आहे. अष्टपैलू बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली हा सामना १ जुलैपासून एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे खेळवला जाणार आहे. यासाठी इंग्लंडचे प्लेइंग-11 घोषित करण्यात आले आहे.आता टीम इंडियाची प्लेइंग-11 किती तगडी असते हे पाहावे लागणार आहे.  

इंग्लंडचा प्लेइंग-11
अॅलेक्स लीस, जॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (सी), सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), मॅथ्यू पॉट्स, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, जेम्स अँडरसन.