ENG vs IND | पाचव्या सामन्याआधी मोठं आव्हान, कॅप्टन बुमराह कोणते हुकमी एक्के काढणार?

टीम इंडिया 1 जुलैपासून इंग्लंड विरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे.

Updated: Jun 30, 2022, 06:04 PM IST
ENG vs IND | पाचव्या सामन्याआधी मोठं आव्हान, कॅप्टन बुमराह कोणते हुकमी एक्के काढणार? title=

मुंबई : टीम इंडिया 1 जुलैपासून इंग्लंड विरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्य़ापूर्वी इंग्लंडचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे या संघाविरूद्ध सामना बूमराह सेनेला कॉंटे की टक्कर ठरणार आहे.  

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर कर्णधारपद जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आलं. त्यामुळे आता  जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली नेमकी कशी टीम मैदानात उतरते हे पाहावे लागणार आहे.  

इंग्लंड संघाने नुकताच न्यूझीलंडविरुद्ध तिसरा कसोटी सामना खेळला. या सामन्यात 7 गडी राखून त्यांनी विजय मिळवला होता.त्यामुळे विजयी सुरात असलेला हा संघ भारताचा पराभव करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.  

'या' दोन खेळाडूंना संधी
इंग्लिश संघाने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. शेवटच्या कसोटीत सहभागी असलेले यष्टिरक्षक बेन फॉक्स आणि जेमी ओव्हरटन यांना वगळण्यात आले आहे. प्लेइंग-11 मध्ये त्याच्या जागी यष्टिरक्षक सॅम बिलिंग्ससह अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला संधी देण्यात आली आहे.

इंग्लंड क्रिकेट संघाला टीम इंडियाविरुद्ध पाचवा कसोटी सामना त्यांच्याच मैदानात खेळायचा आहे. अष्टपैलू बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली हा सामना १ जुलैपासून एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे खेळवला जाणार आहे. यासाठी इंग्लंडचे प्लेइंग-11 घोषित करण्यात आले आहे.आता टीम इंडियाची प्लेइंग-11 किती तगडी असते हे पाहावे लागणार आहे.  

इंग्लंडचा प्लेइंग-11

अॅलेक्स लीस, जॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (सी), सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), मॅथ्यू पॉट्स, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, जेम्स अँडरसन.