पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या हनुमा विहारीचं अर्धशतक, भारताचा संघर्ष सुरूच

आपली पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या हनुमा विहारीनं अर्धशतक झळकावलं आहे. 

Updated: Sep 9, 2018, 05:18 PM IST
पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या हनुमा विहारीचं अर्धशतक, भारताचा संघर्ष सुरूच title=

लंडन : आपली पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या हनुमा विहारीनं अर्धशतक झळकावलं आहे. पदार्पणाच्या टेस्टमध्येच अर्धशतक झळकावणारा हनुमा विहारी २६वा भारतीय क्रिकेटपटू आहे. हनुमा विहारी आणि रवींद्र जडेजा सध्या मैदानात आहेत. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या तासामध्ये भारतानं एकही विकेट गमावली नाही.

तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारतानं १७४-६ अशी केली होती. यानंतर हनुमा विहारी आणि रवींद्र जडेजानं संघर्ष करत भारताचा किल्ला लढवला. ५ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारत ३-१नं पिछाडीवर आहे. या मॅचमध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडचा डाव ३३२ रनवर संपुष्टात आला होता. 

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा