लंडन : भारताचा ओपनिंग बॅट्समन लोकेश राहुल इंग्लंड दौऱ्यात खराब फॉर्ममध्ये आहे. ५ टेस्ट मॅचमध्ये राहुलला अजून एकही अर्धशतक लगावता आलेलं नाही. पण बॅटनं संघर्ष करणारा लोकेश राहुल फिल्डिंग मात्र शानदार करतोय. लोकेश राहुलनं राहुल द्रविडच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. दुसऱ्या दिवशी लोकेश राहुलनं स्टुअर्ट ब्रॉडचा कॅच पकडला. लोकेश राहुलचा हा या सीरिजमधला १३वा कॅच होता.
स्टुअर्ट ब्रॉडच्या कॅचसोबतच लोकेश राहुल इंग्लंडमध्ये एका सीरिजमध्ये सर्वाधिक कॅच पकडणारा खेळाडू बनला आहे. तर एका सीरिजमध्ये सर्वाधिक कॅच पकडण्याच्या राहुल द्रविडच्या रेकॉर्डशी लोकेश राहुलनं बरोबरी केली आहे. द्रविडनं २००४ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये १३ कॅच पकडले होते. एकनाथ सोलकर यांनी १९७२-७३ मध्ये इंग्लंडविरुद्ध १२ कॅच पकडले होते. राहुल द्रविडचं रेकॉर्ड मोडण्यासाठी लोकेश राहुलला आणखी एक संधी आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या इनिंगमध्ये राहुल हा रेकॉर्ड मोडू शकतो.
On a scale of to how good was this catch by KL Rahul? #KyaHogaIssBaar #ENGvIND LIVE on SONY SIX and SONY TEN 3. #SPNSports pic.twitter.com/m9BuMrIFnV
— SPN- Sports (@SPNSportsIndia) September 8, 2018