मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 सीरिज टीम इंडियाने जिंकला आहे. आता वन डे सीरिज खेळवण्यात येणार आहे. आता कोच राहुल द्रविड आणि रोहित शर्माला टीममध्ये कोणाची निवड करावी असा प्रश्न पडला आहे. कारण बॉलरसाठी एकच जागा रिकामा आहे आणि दावेदार तीन आहेत.
तिसऱ्या गोलंदाजासाठी टीममध्ये तीन धोकादायक खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा कोणाला संधी देतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तिन्ही खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असताना.
1.शार्दुल ठाकुर
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे वन डे फॉरमॅटमध्ये पहिल्या पसंतीचे वेगवान गोलंदाज आहेत. भारताला तिसरा गोलंदाज कोण निवडायचा यामध्ये शार्दुल ठाकूर हे नाव आघाडीवर आहे. त्याने 19 सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये तो खूप उत्तम कामगिरी केली आहे. त्याला रोहित शर्मा संधी देऊ शकतो.
2. मोहम्मद सिराज
इंग्लंडच्या पिचवर फास्ट बॉलर्सची नेहमीच मदत होते. त्यामुळे मोहम्मद सिराजचं नाव आघाडीवर आहे. सिराजने भारतासाठी चार कसोटी सामने खेळले आहेत. त्याच्याकडे मॅच फिरवण्याची कला आहे. त्यामुळे द्रविड आणि रोहित याला संधी देऊ शकतो. शार्दुल ठाकूर की मोहम्मद सिराज अशी चुरस असणार आहे.
3. प्रसिद्ध कृष्णा
प्रसिद्ध कृष्णाने वेस्ट इंडिजविरुद्ध आपल्या गोलंदाजीतलं कौशल्य काय आहे ते सिद्ध केलं होतं. स्लो बॉलवर तो झटकन विकेट घेतो. आयपीएल 2022 मध्ये तो राजस्थान रॉयल्सकडून खेळताना मॅच विनर म्हणून समोर आला. प्रसिद्ध कृष्णाने भारतासाठी 7 वन डे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 18 विकेट घेतल्या आहेत.