ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर संपुष्टात

 भारताकडून मिळालेले फॉलोऑन टाळण्यासाठी मैदानात उतरलेल्या यजमानांचा डाव 300 धावांवर संपुष्टात आला. 

Updated: Jan 6, 2019, 11:01 AM IST
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर संपुष्टात title=

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या चौथ्या आणि शेवटच्या दिवसातील पहिले सत्र पावसामुळे रद्द झाले. भारताकडून मिळालेले फॉलोऑन टाळण्यासाठी मैदानात उतरलेल्या यजमानांचा डाव 300 धावांवर संपुष्टात आला. सिडनीच्या मैदानात सुरू असलेल्या या मॅचमध्ये पहिल्या डावात बनवलेल्या धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलिया 322 धावांनी मागे आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात मार्कस हॅरिस (79) ने सर्वाधिक स्कोर केला. याशिवाय मार्नस लाबुशानने 38 आणि पीटर हॅंड्सकॉम्बने 37 रन्सची खेळी केली. कुलदीप यादवच्या फिरकीपुढे कांगारू ढेपाळले. त्याने सर्वाधिक  सर्वाधिक ५ गडी बाद केले. रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शमीने 2-2 विकेट घेतल्या. याशिवाय जसप्रीत बुमराहच्या हाती एक एक विकेट लागली.

भारत 2-1

चौथ्या दिवशी भारतीय वेळेनुसार 8 वाजून 20 मिनिटांनी मॅच सुरू झाली. चौथ्या दिवशी देखील पाऊस सुरूच राहिला आणि 3 तासांचा खेळ फुकट गेला. मॅचच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 6 विकेटच्या बदल्यात 236 धावा केल्या. पीटर हॅंड्सकॉम्ब 28 आणि पॅट कमिंस 25 धावांवर नाबाद राहिले. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या टेस्ट मॅचच्या सिरिजमध्ये भारत 2-1 ने पुढे आहे.