INDvsAUS : दुसऱ्या दिवशी पुजाराचं शतक आणि विराटचं सरप्राईज

 चेतेश्वर पुजारानं शतक तर कॅप्टन विराट कोहली, मयंक अग्रवाल, रोहित शर्मानं अर्धशतक ठोकलं

Updated: Dec 27, 2018, 02:03 PM IST
INDvsAUS : दुसऱ्या दिवशी पुजाराचं शतक आणि विराटचं सरप्राईज title=

मेलबर्न : कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतानं ऑस्ट्रेलियासमोर ७ बाद ४४३ धावांचा डोंगर रचलाय. मयांक अग्रवाल, विराट कोहली, रोहित शर्माची अर्धशतकं आणि चेतश्वर पुजाराचं खणखणीत शतकाच्या जोरावर भारतानं आज दिवसभर कांगारुंच्या गोलंदाजांची पिसं काढली. संयम आणि वेग याचा उत्तम मिलाफ आज भारतीय फलंदाजांच्या खेळात बघायला मिळाला. चेतश्वर पुजारानं १०६ धावा काढल्या. तर विराट कोहली ८२ धावांची बहुमोल खेळी केली. अजिक्य राहणे आणि रोहित शर्मा या दोन्ही मुंबईकरांनी अर्धशतकी भागीदारी करून भारताची धावसंख्या साडे तीशनेच्या पलिकडे नेली. राहणे बाद झाल्यावर रिषभ पंतनं धावांचा रतीब कायम राखला. अखेर पंत आणि जडेजा तंबूत परतल्यावर विराट कोहलीनं सरप्राईज देत डाव घोषित केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून सुरुवातीलाच मार्कस हॅरीस आणि अॅरॉन फिन्च मैदानात उतरलेत. 

भारतानं डाव केला घोषित

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान टेस्ट सीरिजच्या तिसऱ्या मॅचच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडिया कॅप्टन विराट कोहलीनं रवींद्र जडेजाच्या रुपात सातव्या ओव्हर गेल्यानंतर डाव घोषित केला. यामुळे टीम इंडियाचा स्कोअर पहिल्या डावात ७ विकेटवर ४४३ रन्स राहिला. भारत: ४४३/७ (१६९.४ ओवर्स)

टीम इंडियाच्या या डावात चेतेश्वर पुजारानं शतक तर कॅप्टन विराट कोहली, मयंक अग्रवाल, रोहित शर्मानं अर्धशतक ठोकलं. ऋषभ पंत ३९ तर रहाणेनं ३४ रन्सचं योगदान दिलं. 

पुजारानंतर अजिंक्य रहाणे आणि रोहीत शर्मा यांनी चांगली सुरूवात केली. मात्र थोड्याच वेळात अजिंक्य नॅथन लॉयनचा शिकार ठरला. अजिंक्यनं ७६ बॉल्समध्ये ३४ रन्स केले. अजिंक्यनंतर ऋषभ पंतनं मैदानात एन्ट्री घेतलीय.    

चेतेश्वर पुजाराचं शानदार शतक 

चेतेश्वर पुजाराच्या रुपात भारतानं चौथी विकेट गमावली. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टेस्ट सीरिजच्या तिसऱ्या मॅचच्या दुसऱ्या सत्रात विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा बाद झाले. त्यानंतर अजिंक्य रहाणे (३० रन्स) आणि रोहीत शर्मा (१३ रन्स) यांनी टीम इंडियाची धुरा आपल्या खांद्यावर सांभाळली. चहाच्या वेळेवपर्यंत या दोघांनी भारताचा स्कोअर ३४६/४ (१४३ ओव्हर्स) पर्यंत पोहचवला. 

मेलबर्न कसोटीत भारत मजूबत स्थितीत आहे. सलामीवीर हनुमा विहारी बाद झाल्यापासून खेळपट्टीवर पाय रोवून उभ्या असलेल्या चेतेश्वर पुजारानं आज सकाळी कारकीर्दीतलं १७ शानदार शतक ठोकलंय. तिकडे कर्णधार विराट कोहलीनं पुजाराच्या साथीनं कांगारुंच्या गोलंदाजांना दमवण्याचा सिलसिला कायम ठेवला.

उपहाराला खेळ थांबला त्यावेळी पुजारा १०३ तर विराट कोहली ६९ धावांवर नाबाद आहेत. त्यानंतर कोहली ८२ धावांवर तर पुजारा १०६ धावांवर बाद झाला. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे सध्या मैदानात भारताचा डाव आणखी मजबूत करत आहेत.

भारतानं तीनशे धावांचा टप्पा ओलांडला असून  कांगारुंकडून पॅट कमिन्सला ३ तर मिचेल स्टर्कला १ बळी मिळालाय.