INDvsAUS T20: ...तर ७० वर्षात पहिल्यांदाच होईल हा रेकॉर्ड

दुस-या टी-२० सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्याने ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या सीरिजमध्ये बरोबरीत जागा मिळवली आहे. आज तिसरा सामना खेळला जाणार असून सीरिज खिशात घालण्यासाठी दोन्ही टीम्ससाठी हा सामना महत्वाचा ठरणार आहे.  

Updated: Oct 13, 2017, 12:32 PM IST
INDvsAUS T20: ...तर ७० वर्षात पहिल्यांदाच होईल हा रेकॉर्ड title=

नवी दिल्ली : दुस-या टी-२० सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्याने ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या सीरिजमध्ये बरोबरीत जागा मिळवली आहे. आज तिसरा सामना खेळला जाणार असून सीरिज खिशात घालण्यासाठी दोन्ही टीम्ससाठी हा सामना महत्वाचा ठरणार आहे.  

टीम इंडिया वनडे सीरिजसोबतच टी-२० सीरिजही आपल्या नावावर करण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरेल. टीम इंडियाने जर हा सामना जिंकला तर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियासोबत लगातार चार सीरिज जिंकण्याचा कारनामा टीम इंडिया करेल. टीम इंडिया जर आजचा सामना जिंकली तर ७० वर्षात जे झाले नाही ते पहिल्यांदाच होईल. 
 
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासोबत खेळलेल्या याआधीच्या तिन्ही सीरिजमध्ये लागोपाठ विजय मिळवला. २०१६ मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच होमग्राऊंडवर टी-२० सीरिजमध्ये ३-० ने मात दिली होती. त्यानंतर त्याच वर्षी भारतात झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये २-१ ने टीम इंडियाने विजय मिळवला होता. तसेच नुकत्याच झालेल्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाने कागांरूंना ४-१ ने मात देत सीरिज आपल्या नावावर केली. 

आजचा सामना विराट सेनेने जिंकला तर आयसीसी रॅंकिंगमध्ये मोठा फरक बघायला मिलेल. आयसीसी टी-२० रॅंकिंगमध्ये टीम इंडिया सध्या पाचव्या स्थानावर आहे. जर टीम इंडिया तिसरा टी-२० सामना जिंकेल तर टीम इंडियाच्या रॅंकिंगमध्ये काहीच फरक पडणार नाही. पण ऑस्ट्रेलिया जिंकली तर टीम इंडिया पाचव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर येईल.