भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज पहिला टी 20 सामना

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पहिला टी-२० सामना विशाखापट्टणम् येथे रंगणार आहे.

Updated: Feb 24, 2019, 08:41 AM IST
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज पहिला टी 20 सामना  title=

नवी दिल्ली : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पहिला टी-२० सामना विशाखापट्टणम् येथे रंगणार आहे. मालिकेत विजयी सलामी देण्यास भारतीय संघ प्रयत्नशील असेल. जसप्रित बुमराहने संघात पुनरागमन केल्याने भारतीय संघाची गोलंदाजीची धार बळकट होईल. नुकत्याच न्यूझीलंडमध्ये झालेल्या टी-२० मालिकेत भारताला १-२ नं पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय टीम पहिल्या टी 20 सीरिजमध्ये आपला प्रभाव कायम ठेवणार आहे.  भारताने मागच्या महिन्यात ऑस्ट्रेलिया सोबत झालेली टेस्ट आणि वनडे सीरिजमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला होता. वर्ल्ड कपच्या आधी कोच रवि शास्त्री यांना काही खेळाडूंच्या जागा टीममध्ये पक्क्या करायच्या आहेत. 

ऋषभ पंत आणि विजय शंकर यांना टीममध्ये आपले स्थान पक्के करण्याचे आव्हान आहे. पंत याने वनडेमध्ये दिनेश कार्तिकची जागा घेतली आहे तर शंकरने न्यूझीलंड दौऱ्यात चांगले प्रदर्शन केले. बॉलिंगमध्ये फास्ट बॉलर बुमराहचे पुनरागम झाले आहे. बुमराह टी20 मध्ये 50 विकेट पूर्ण करण्यास 2 विकेट दूर आहे. असा करणारा तो दूसरा बॉलर ठरणार आहे. याआधी रविचंद्रन आश्विनने हा कारनामा केला आहे. तसेच लेग स्पीनर मयंक मार्कंडेच्या प्रदर्शनाकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे. जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करतोय. याशिवाय युजवेंद्र चहल आणि कृणाल पांड्या यांना देखील मैदानात उतरवे जाऊ शकते. 

संभाव्य संघ 

भारत : विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा , लोकेश राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, विजय शंकर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, सिद्धार्थ कौल, मयंक मार्कंडे. 

ऑस्टेलिया : एरॉन फिंच (कॅप्टन), डी आर्की शॉर्ट, पैट कमिंस, एलेक्स कैरी, जेसन बेहरनडोर्फ, नाथन कल्टर नाइल, पीटर हैंड्सकोंब, उस्मान ख्वाजा, नाथन लॉयन, ग्लैन मैक्सवेल, झाए, रिचर्डसन, केन रिचर्डसन, मार्कस स्टोयनिस, एश्टन टर्नर, एडम जम्पा.