कोहली, धोनी नाही तर या ५ खेळाडूंवर सर्वांची नजर

 या टी-२० मालिकेत भारताची मदार या पाच खेळांडूवर असणार आहे.  

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 6, 2017, 10:32 AM IST
 कोहली, धोनी नाही तर या ५ खेळाडूंवर सर्वांची नजर  title=

नवी दिल्ली : 'विराट' सेनेने ऑस्ट्रेलियाला ४-१ अशी धूळ चारल्यानंतर आता दोन्ही टी-२० सामन्यासाठी सज्ज झाल्या आहेत. तीन टी-२० सामन्यांची मालिकाही जिंकण्याचा भारताचा प्रयत्न राहणार आहे. तर खेळात कमबॅक करायचा ऑस्ट्रेलिया प्रयत्न करणार आहे. या टी-२० मालिकेत भारताची मदार या पाच खेळांडूवर असणार आहे. 

केएल राहुल

बेंगळूरच्या  या फलंदाजाने पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांत १९६ धावा केल्या आहेत. त्यानंतर सात मॅचमध्ये राहुलने केवळ ५४ धावा केल्या आहेत. तरीही कर्णधार विराट कोहली व निवड समितीचे एमएसके प्रसाद लोकेश हे केएल राहुलच्या पाठीशी आहेत.

कुलदीप यादव

डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शानदार प्रदर्शन केले आहे. विकेट चेंडू फिरविण्याची वेगळी शैली असल्याने त्याचे हजारो क्रिकेट चाहते आहेत.  शेन वॉर्न आणि ब्रॅड हॉग सारख्या प्रख्यातांनी या चायनामॅन गोलंदाजाची प्रशंसा केली आहे.

अक्षर पटेल

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दाखल झाल्यानंतर अष्टपैलू अक्षर पटेलने सतत आपल्या खेळात सुधारणा केली आहे. तरी अजून सुधारणेसाठी वाव आहे.  तो गोलंदाजीत चांगली गती आणत फलंदाजाच्या दिशेने वेगवान चेंडु फेकतो. पण त्याची फलंदाजी अजूनही कमकुवत आहे.

दिनेश कार्तिक

 भारतासाठी १०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने याने खेळले आहेत.  पण ३०  पेक्षा अधिक सरासरीत तो खेळला नाही. जर आयपीएलचा हा महान फलंदाज आपल्या फॉर्ममध्ये राहिला तर संघात स्वत: साठी जागा बनवू शकतो.

आशिष नेहरा

'किंग ऑफ कमबॅक' अशी ओळख असलेला आशिष नेहराने संघात पुनरागमन करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. ३८ वर्षीय नेहराच्या फिटनेसने अनेक युवा खेळाडूंना मात दिली आहे. खराब फॉर्ममुळे नेहराला संघात स्थान देण्यात आले नव्हते.. त्याने आतापर्यंत १२ शस्त्रक्रिया केल्या आहेत, परंतु दिल्लीतला हा महान क्रिकेटपटू नव्या दमात प्रत्येक वेळी पुनरागमन करतो.