ऑस्ट्रेलियाचे 287 धावांचे आव्हान, भारताच्या 15 धावांवर 2 विकेट

भारतीय संघाच्या टी टाईम पर्यंत दोन विकेट गेल्या आहेत. 

Updated: Dec 17, 2018, 12:44 PM IST
ऑस्ट्रेलियाचे 287 धावांचे आव्हान, भारताच्या 15 धावांवर 2 विकेट title=

पर्थ : भारत आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेला दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी भारता 287 धावांचे लक्ष्य मिळाले. याच उत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या टी टाईम पर्यंत दोन विकेट गेल्या आहेत. दोन्ही संघांसाठी सोमवारचा दिवस महत्त्वपूर्ण असणार आहे. चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या डावात 4 विकेट /132 रन्सवर खेळायला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची टीम 243 रन्सवर तंबूत परतली. यजमान संघाने पहिल्या डावात मिळालेल्या 43 रन्सच्या जोरावर 286 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे भारताला 287 धावांचे लक्ष्य मिळाले.

15 धावा 2 विकेट 

के.एल राहुल आजच्या सामन्यातही सपशेल अपयशी ठरला. मिथेल स्टार्सने त्याला भोपळाही फोडू न देता तंबूत पाठवले. चेतेश्वर पुजाराही केवळ 4 रन्सची भर घालून आऊट झाला. जॉश हेझलवूडच्या बॉलिंगवर टिम पॅनने त्याला आऊट केलं. सध्या मुरली विजय आणि कॅप्टन विराट कोहली खेळ सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. 

मॅचच्या तिसऱ्या दिवशी स्टार कॅप्टन विराट कोहलीने 25 वे कसोटी शतक आणि 63 वे आंतरराष्ट्रीय शतक लगावले. त्याच्या शतकी खेळीमुळे भारतीय संघाने ऑलआऊट होण्याआधी 283 रन्स बनवले होते. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाचा खेळ 326 रन्सचा होता. त्या तुलनेत हा स्कोर खूपच मागे होता. दुसऱ्या डावात बॅटींगला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने तिसऱ्या दिवसाचा डाव संपेपर्यंत 4 विकेट आणि 132 रन्स बनवले. म्हणजेच तिसरा दिवस संपेपर्यंत त्यांनी 175 रन्सची आघाडी घेतली.