INDvAUS: मॅचपूर्वी मध्यप्रदेश क्रिकेट बोर्डाची वेबसाईट झाली हॅक

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरी वन-डे मॅच रविवारी खेळली जाणार आहे. मात्र, या मॅचपूर्वी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 23, 2017, 09:53 PM IST
INDvAUS: मॅचपूर्वी मध्यप्रदेश क्रिकेट बोर्डाची वेबसाईट झाली हॅक  title=
File Photo

इंदूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरी वन-डे मॅच रविवारी खेळली जाणार आहे. मात्र, या मॅचपूर्वी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तिसऱ्या वन-डे मॅचपूर्वी मध्यप्रदेश क्रिकेट संघ (एमपीसीए)ची अधिकृत वेबसाईट हॅक करण्यात आली. वेबसाईट हॅक झाल्याने या वेबसाईटवरील अनेक पेजेस काही तास ओपन होत नव्हते.

या वेबसाईटवरील काही पेज ओपन केल्यास "नोबडी कॅन गिव्ह यू फ्रीडम, नोबडी कॅन गिव यू इक्वालिटी ऑर जस्टिस, इफ यू आर ए मॅन, यू टेक इट." असा मेसेज येत होता.

'रिजी हॅक्सर' च्या रुपाने आपली ओळख सांगणाऱ्या हॅकरने मेसेज दिला की, "हॅलो अॅडमिन, युअर वेबसाईट इज जीरो परसेंट सिक्योर, पॅच इट ऑर आय विल बी बॅक देयर. डोंट हेट मी, हेट युअर सिक्युरीटी."

एमपीसीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पंडित यांनी म्हटलं की, ही वेबसाईट हॅक होण्यासंदर्भात मला काहीही माहिती नाहीये. सध्या वेबसाईटवर काम करण्यात येत आहे. तर पोलीस उप महानिरीक्षक हरिनारायणचारी मिश्रा यांनी सांगितलं की, एमपीसीएने  वेबसाईट हॅक होण्यासंदर्भात कुठलीही तक्रार केलेली नाहीये.