INDvsAUS: भारताला दिल्ली जिंकण्याचं आव्हान

सीरिजमध्ये २-२ अशी बरोबरी झाली आहे.

Updated: Mar 12, 2019, 03:24 PM IST
INDvsAUS: भारताला दिल्ली जिंकण्याचं आव्हान title=

दिल्ली : भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वनडे सीरिजमधील अखेरची मॅच १३ मार्चला दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानात खेळली जाणार आहे. ही मॅच दोन्ही टीमसाठी प्रामुख्याने भारतासाठी मह्त्वाची असणार आहे. पाच मॅचच्या सीरिजमध्ये भारताने पहिल्या दोन तर यानंतरच्या दोन मॅच ऑस्ट्रेलियाने जिंकल्या आहेत. यामुळे सीरिजमध्ये २-२ अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे उद्या (१३ मार्च) होणारी मॅच क्रिकेट रसिकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

ही मॅच जिंकण्यासाठी भारतावर अधीक दबाव असेल. कारण याआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेली टी-२० सीरिज भारताने गमावली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही सीरिज वर्ल्ड कपच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानली जात आहे.

कोटलावरील भारताची कामगिरी 

भारताने आतापर्यंत या मैदानात एकूण १९ मॅच खेळल्या आहेत. त्यापैकी १२ मॅचमध्ये विजय झाला आहे. तर ६ मॅचमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे एक मॅच रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या मैदानावरील रेकॉर्ड भारताच्या बाजूने आहे.

ऑस्ट्रेलियाची कोटलावरील कामगिरी 

ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत या मैदानावर एकूण ५ मॅच खेळल्या आहेत. यापैकी केवळ २ मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला. तर ३ मॅचमध्ये पराभव झाला आहे. या मैदानावर ऑस्ट्रेलियाने भारताला आणि दुबळ्या झिमब्बावेला हरवले आहे. तर भारताने ऑस्ट्रेलियाला ३ वेळा हरवले आहे. 

ऑस्ट्रेलियाने या मैदानावर अखेरची मॅच तब्बल २१ वर्षांपूर्वी जिंकली होती. यावेळी ऑस्ट्रेलियाने भारताचा ४ विकेटने पराभव केला होता. या ट्रॅन्ग्युलर सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाने अंतिम मॅचमध्ये भारताला २२७ रनवर रोखले होते. तर प्रत्युतरादाखल मायकल बेवन आणि कॅप्टन स्टीव वॉ या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने मॅचसोबत सीरिजदेखील जिंकली होती.

भारत ऑस्ट्रेलिया या टीममध्ये दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात २१ व्या शतकात केवळ एकच मॅच खेळली गेली. २००९ साली खेळण्यात आलेल्या मॅचमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा ६ विकेटने पराभव केला होता. आताच्या टीममधील धोनी आणि रविंद्र जडेजा हे त्या मॅचमध्ये सहभागी होते. धोनीने या मॅचमध्ये ७१ रनची खेळी केली होती. तर रविंद्र जडेजाने २ विकेट मिळवल्या होत्या.

५ मॅचच्या सीरिजमध्ये २-२ अशी बरोबरी आहे. त्यामुळे अखेरची आणि ५ वी मॅच अटीतटीची ठरणार आहे. या मॅचमध्ये सर्वाधिक रन केल्या जाऊ शकतात. परंतू या मैदानात आतापर्यंत उभय टीमना ३०० चा टप्पा गाठता आलेला नाही. २८९ ही या मैदानावरील भारताची सर्वोच्च खेळी आहे. तर ऑस्ट्रेलियाने २९४ रनची सर्वोच्च खेळी या मैदानावर केली आहे.