सि़डनी : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिसरी आणि अखेरची टी-२० सिडनीमध्ये आज रंगणार आहे. तीन टी-२०च्या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियानं पहिली लढत जिंकत १-०नं आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या टी-२० लढत पावसामुळे रद्द झाली होती. यामुळे आता तिसऱ्या आणि अखेरच्या लढतीत विजय साकारत भारतासमोर मालिका बरोबरीत राखण्याचं आव्हान असेल. भारतानं सलग सात टी-२० मालिका जिंकण्याचा पराक्रम केलाय. मात्र आता ही मालिका जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगलं असून भारताला आता निदान मालिका बरोबरीत सोडावी लागणार आहे.
यामुळे भारतासाठी ही लढत 'करो या मरो' अशीच असेल. दुसऱ्या मेलबर्न टी-२० लढतीत भारतीय गोलंदाजांनी प्रभावशाली कामगिरी केली होती.
सिडनीची खेळपट्टी संथ असल्यानं कृणाल पंड्याला संघाबाहेर ठेवण्याची शक्यता नाही.
विराट कोहली, रोहीत शर्मा, शिखर धवन यांच्यावर प्रामुख्यानं भारतीय फलंदाजीची मदार असेल.
तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोंलदाज बिली स्टेनलेक दुखापतग्रस्त झाल्यानं कांगारुंच्या गोटात चिंतेचं वातावरण असेल.