India vs Australia, 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातल्या पहिले दोन सामने जिंकत भारताने (Team India) याधीच मालिका खिशात घातली आहे. आता तिसरा एकदिवसीय सामना 27 सप्टेंबरला म्हणजे बुधवारी खेळवला जाणार आहे. राजकोटमध्ये (Rajkot) हा सामना रंगणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल.
रोहित शर्माची पत्रकार परिषद
तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पत्रकार परिषद घेतली. या सामन्यात सलामीचा फलंदाज शुभमन गिल याच्यासहित पाच खेळाडू तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळणार नसल्याचं रोहित शर्माने सांगितलं. काही खेळाडूंना व्हायरल फिव्हर झालाय तर काही खेळाडू आपापल्या घरी गेले आहेत.
हे खेळाडू मालिकेतून बाहेर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला केवळ 13 खेळाडूंमधून प्लेईंग इलेव्हनची निवड करायची आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात खेळणारे मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर तसंच एकही सामना खेळणारा हार्दिक पांड्या आपापल्या घरी गेले आहेत. तर शुभमन गिलला विश्वचषक स्पर्धेपूर्वी आराम देण्यात आला आहे. एशिया कप दरम्यान दुखापत झालेला अक्षर पटेल उपचार घेत आहे. पत्रकार परिषेदत रोहित शर्माने आपले काही खेळाडू अस्वस्थ असून तिसऱ्या सामन्यात खेळण्यासाठी उपलब्ध नसल्याचं सांगितलं. भारतीय संघात निवडीसाठी केवळ 13 खेळाडू उपलब्ध आहेत.
हे खेळाडू संघात
तिसऱ्या एकदिवसयी सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) या खेळाडूंचं पुनरामन होणार आहे. त्यामुळे ईशान किशन, प्रसिद्ध कृष्णा या खेळाडूंना बाहेर बसावं लागण्याची शक्यता आहे. राजकोटची खेळपट्टी इंदौरसारखं हायस्कोरिंग आहे. त्यामुळे सर्वोत्तम प्लेईंग इलेव्हनसह टीम इंडिया मैदानात उतरेल.
संघ निश्चित करण्यासाठी सामना अत्यंत महत्त्वाचा
भारताने 17 खेळाडूंचा भारतीय संघ वर्ल्डकपसाठी यापूर्वीच जाहीर केला आहे. मात्र यात बदल होण्याची दाट शक्यता आहे. येत्या अठ्टावीस तारखेपर्यंत संघ निश्चित करण्याची अंतिम तारीख आहे. अक्षर पटेल दुखापतग्रस्त असल्याने तो शेवटचा एकदिवसीय सामनाही खेळणार नाही. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी तो दुखापतीतून सावरण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे त्याच्या जागी वर्ल्डकपच्या संघात आर. अश्विन किंवा वॉशिंग्टन सुंदरला स्थान मिळू शकतं. आर. अश्विनने दोन्ही एखदिवसीय सामन्यांमध्ये उत्तम गोलंदाजी केली आहे.