India T20I Squad for Sri Lanka : झिम्बॉब्वे दौऱ्यानंतर आता टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर (India vs Sri lanka) जाणार आहे. अशातच बीसीसीआयने टी-ट्वेंटी आणि वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माने (Rohit Sharma) निवृत्ती घेतल्यानंतर कॅप्टन कोण होणार? असा सवाल विचारला जात होता. मात्र, आता बीसीसीआयने सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्यावर विश्वास दाखवला असून त्याला संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवली आहे. तर दुसरीकडे हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) दुहेरी झटका बसला आहे.
श्रीलंका दौऱ्यात सुर्यकुमार यादव टीम इंडियाचा कॅप्टन असेल तर शुभमन गिल या युवा खेळाडूवर उपकर्णधारपदाची धुरा सांभाळण्यास दिली आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याला मोठा धक्का बसलाय, असं म्हटलं जातंय. तर यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग यांना संधी देण्यात आलीये. संजू सॅमसन आणि शिवम दुबे या दोन विश्वासू खेळाडूंना देखील संघात जागा देण्यात आली आहे. तर श्रीलंकाचा कर्दनकाळ ठरलेला मोहम्मद सिराज याला देखील संघात स्थान मिळालं आहे.
दरम्यान, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोनी या तीन फिरकीपटूंना देखील पुन्हा संधी मिळाली आहे. तर अर्शदीप सिंग आणि खलील अहमद गोलंदाजीची धुरा सांभाळतील.
#TeamIndia's squad for 3 T20Is & 3 ODIs announced
Read More
— BCCI (@BCCI) July 18, 2024
टी-ट्वेंटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ - सूर्यकुमार यादव (C), शुबमन गिल (VC), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (WK), संजू सॅमसन (WK), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोनी, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.