रोहित-धवनची वादळी खेळी, भारताचा धावांचा डोंगर

 रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या वादळी खेळीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारतानं २० ओव्हरमध्ये ३ विकेट्सच्या मोबदल्यात २०२ रन्स बनवल्या आहेत. 

Updated: Nov 1, 2017, 08:34 PM IST
रोहित-धवनची वादळी खेळी, भारताचा धावांचा डोंगर title=

नवी दिल्ली : रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या वादळी खेळीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारतानं २० ओव्हरमध्ये ३ विकेट्सच्या मोबदल्यात २०२ रन्स बनवल्या आहेत.

दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात होत असलेल्या या मॅचमध्ये न्यूझीलंडनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. पण ओपनिंगला आलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवननं १५८ रन्सची पार्टनरशीप केली. शिखर धवननं ५२ बॉल्समध्ये ८० तर रोहित शर्मानं ५५ बॉल्समध्ये ८० रन्स केल्या. तर विराट कोहलीनं ११ बॉल्समध्ये नाबाद २६ आणि धोनीनं २ बॉल्समध्ये नाबाद ७ रन्स बनवले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणाऱ्या आशिष नेहराला या मॅचमध्ये संधी देण्यात आली आहे. वनडे सीरिज २-१नं जिंकल्यानंतर आता ३ मॅचची टी-20 सीरिजही खिशात टाकण्यासाठी कोहली ब्रिगेड मैदानात उतरली आहे.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा