IND vs SA : भारतीय गोलंदाजांसमोर साऊथ अफ्रिकेचं 'सरेंडर', विजयासाठी 117 धावांचं आव्हान!

India vs South Africa : साऊथ अफ्रिकाविरुद्ध अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि आवेश खान यांच्या भेदक गोलंदाजीसमोर साऊथ अफ्रिका 116 धावांवर ऑलआऊट झाली.

सौरभ तळेकर | Updated: Dec 17, 2023, 04:15 PM IST
IND vs SA : भारतीय गोलंदाजांसमोर साऊथ अफ्रिकेचं 'सरेंडर', विजयासाठी 117 धावांचं आव्हान! title=
IND vs SA, Arshdeep Singh, Avesh Khan

South Africa vs India, 1st ODI : साऊथ अफ्रिकाविरुद्ध अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि आवेश खान यांच्या भेदक गोलंदाजीसमोर साऊथ अफ्रिका 116 धावांवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंग आणि आवेश खान (Avesh Khan) यांनी कमालीची गोलंदाजी केली. अर्शदीपने 5 विकेट्स घेत नवा इतिहास रचला तर आवेश खानने 4 विकेट्स खोलल्या अन् भारताचं आव्हान सोपं केलंय. त्यामुळे आता टीम इंडियाला विजयासाठी फक्त 117 धावा करायच्या आहेत. 

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय कॅप्टन एडन मार्करामला महागात पडला. सलामीवीर रीझा हेंड्रिक्स आणि रॅसी व्हॅन डर ड्युसेन झटपट बाद झाले. त्यामुळे टोनी डी झॉर्झी याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यालाही अर्शदीपच्या घातक गोलंदाजीसमोर गुडघे टेकवावे लागले. साऊथ अफ्रिकेचा डाव पत्त्यासारखा कोसळला. मात्र, अँडिले फेहलुकवायो याने 33 धावांची महत्त्वाची खेळी करत साऊथ अफ्रिकेची लाज राखली. त्यानंतर कुलदीप यादवने शेवटची विकेट घेतली अन्  साऊथ अफ्रिकेचा खेळ 116 धावांवर खल्लास केला.

साऊथ अफ्रिका : एडन मार्कराम (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झॉर्झी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, नांद्रे बर्गर, तबरेझ शम्सी.

टीम इंडिया : लोकेश राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार.