नॉटिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच भारताची आघाडी ३०० रनच्या पुढे गेली आहे. त्यामुळे भारतानं या टेस्टवरची आपली पकड आणखी मजबूत केली आहे. आता इंग्लंडला ही टेस्ट मॅच जिंकण्यासाठी मोठा चमत्कारच करावा लागेल.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर १२४-२ एवढा होता. पहिल्या इनिंगमध्ये भारताला १६८ रनची आघाडी मिळाली होती. दुसऱ्या दिवसाअखेर चेतेश्वर पुजारा ३३ रनवर आणि विराट कोहली ८ रनवर खेळत होता. इंग्लंडच्या टीमला १६१ रनवर ऑल आऊट केल्यानंतर बॅटिंगला आलेले भारताचे ओपनर शिखर धवन आणि लोकेश राहुलनं भारताला चांगली सुरुवात करून दिली. ६० रनवर भारताची पहिली विकेट पडली. लोकेश राहुल ३३ बॉलमध्ये ३६ रन करून आऊट झाला. तर शिखर धवन ४४ रनवर आदिल रशिदच्या बॉलिंगवर स्टंम्पिंग झाला.
त्याआधी पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडची टीम १६१ रनवर ऑल आऊट झाली. हार्दिक पंड्यानं ६ ओव्हरमध्ये २८ रन देऊन इंग्लंडच्या ५ विकेट घेतल्या. तर इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. मोहम्मद शमीला एक विकेट घेण्यात यश आलं. इंग्लंडकडून जॉस बटलरनं ३२ बॉलमध्ये ३९ रनची जलद खेळी केली. हार्दिकच्या टेस्ट कारकिर्दीमधल्या या पहिल्या ५ विकेट आहेत.