पुजारा-रहाणेच्या शतकामुळे भारत मजबूत स्थितीत

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या शतकामुळे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे.

Updated: Aug 3, 2017, 06:00 PM IST
पुजारा-रहाणेच्या शतकामुळे भारत मजबूत स्थितीत  title=

कोलंबो : चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या शतकामुळे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर ३४४/३ एवढा झाला होता. दिवसाअखेरीस चेतेश्वर पुजारा नाबाद १२८ रन्सवर तर अजिंक्य रहाणे नाबाद १०३ रन्सवर खेळत होता.

मागच्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये १९० रन्स करणारा शिखर धवन या इनिंगमध्ये ३५ रन्स करून आऊट झाला तर के.एल.राहुल ५७ रन्सवर रनआऊट झाला. मागच्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये शतक झळकवणाऱ्या विराटला मोठी धावसंख्या करता आली नाही. विराट १३ रन्स करून आऊट झाला. श्रीलंकेकडून हेराथ आणि परेरानं प्रत्येकी एक विकेट घेतली.