चेतेश्वर पुजारापाठोपाठ अजिंक्य रहाणेचंही शतक

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये पुजारापाठोपाठ अजिंक्य रहाणेनंही शानदार शतक झळकवलं आहे.

Updated: Aug 3, 2017, 05:04 PM IST
चेतेश्वर पुजारापाठोपाठ अजिंक्य रहाणेचंही शतक  title=

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये पुजारापाठोपाठ अजिंक्य रहाणेनंही शानदार शतक झळकवलं आहे. अजिंक्य रहाणेचं हे टेस्ट क्रिकेटमधलं हे नववं शतक आहे. पुजारा आणि रहाणेच्या शतकांमुळे भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. भारतानं तीन विकेट्सच्या मोबदल्यात सव्वातिनशेचा टप्पा ओलांडला आहे.

गेल्या मॅचमध्ये १९० रन्स बनवणारा शिखर धवन ३५ रन्सवर आऊट झाला तर के.एल. राहुलनं ५७ रन्स बनवल्या. मागच्या मॅचमध्ये शतक मारलेला कॅप्टन विराट कोहली मात्र या मॅचमध्ये फक्त १३ रन्स करून बाद झाला.

लाईव्ह स्कोअरबोर्ड पाहण्यासाठी क्लिक करा