अजून श्रीमंत होणार BCCI; 'या' कंपनीची डील क्रिकेट बोर्डाला करणार मालामाल

या कराराची किंमत ऐकून तुमचेही डोळे विस्फारतील. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआयवर आता जणू पैशांचा पाऊस पडणार आहे. 

Updated: Feb 22, 2023, 08:22 PM IST
अजून श्रीमंत होणार BCCI; 'या' कंपनीची डील क्रिकेट बोर्डाला करणार मालामाल title=

BCCI-Adidas: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border–Gavaskar Trophy) सुरु आहे. सध्याच्या घडीला टीम इंडियाच्या जर्सीवर MPL आणि किलर जींसचा लोगो आहे. मात्र या सिरीजनंतर हा लोगो भारतीय जर्सीवरून हटणार आहे. बीसीसीआयने जर्मन कंपनी एडिडाससोबत येत्या 5 वर्षांसाठी करार केला आहे. ज्याची किंमत सध्या असलेल्या स्पॉन्सरपेक्षा (sponsor) कित्येक पटीने जास्त आहे.

या कराराची किंमत ऐकून तुमचेही डोळे विस्फारतील. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआयवर आता जणू पैशांचा पाऊस पडणार आहे. 

BCCI ने एडिडाससोबत (Adidas) केला 350 कोटींचा करार 

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) हे जगातील सर्वात मोठं बोर्ड आहे. लवकरच हे बोर्ड प्रचंड मालामाल होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय आणि एडिडास यांच्यामध्ये करार झाला आहे. ज्या अंतर्गत जर्मन कंपनी 5 वर्षांपर्यंत हा करार असणार आहे. यामुळे टीम इंडियाला 350 कोटी रूपये मिळणार आहेत. दर वर्षाला कंपनी बीसीसीआयला 70 कोटी रूपये देणार आहे. (Adidas to sponsor India cricket team)

MPL ने BCCI शी तोडला करार

यापूर्वी टीम इंडियाच्या जर्सीवर MPL चा लोगो असायचा. ही कंपनी टीम इंडियाच्या खेळाडूंना कीट स्पॉन्सर करते. MPL ने अचानक बीसीसीआयशी करार तोडून टाकला. आता हे डील एडिडास कंपनीने मिळवलं आहे. या कंपनीसोबत हा करार पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे. यापूर्वी 2020 पर्यंत Nike कंपनी टीम इंडियाशी संबंधित होती. टीम इंडिया आणि नायकी यांचा करार 14 वर्षांच्या कालावधीसाठी होता. नायकी प्रत्येक सामन्यासाठी 85 लाख रुपये देत होतं.