सेहवागला नाही ‘विराट सेने’वर भरोसा! खेळाडूंना दिला हा सल्ला

वर्नोन फिलेंडरच्या सहा विकेट्सच्या भरोशावर साऊथ आफ्रिकेच्या टीमने टीम इंडियाला पहिल्या टेस्टमधेय ७२ रन्सनी मात दिली. तीन टेस्टच्या या सीरिजमध्ये साऊथ आफ्रिकेने १-० ने आघाडी घेतली आहे.

Updated: Jan 11, 2018, 11:11 AM IST
सेहवागला नाही ‘विराट सेने’वर भरोसा! खेळाडूंना दिला हा सल्ला title=

नवी दिल्ली : वर्नोन फिलेंडरच्या सहा विकेट्सच्या भरोशावर साऊथ आफ्रिकेच्या टीमने टीम इंडियाला पहिल्या टेस्टमधेय ७२ रन्सनी मात दिली. तीन टेस्टच्या या सीरिजमध्ये साऊथ आफ्रिकेने १-० ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाला आणखीन सांभाळून खेळायचं आहे. अशात माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग याने टीम इंडियाबद्दल एक धक्का देणारं भाकित केलं आहे.   

३० टक्के शक्यता

सेहवागने एका वॄत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, ‘आता तर असं वाटतंय की, टीम इंडियाच्या वापसीची शक्यता केवळ ३० टक्केच आहे. आता ही सीरिज खूपच कठिण होणार आहे. तसेच टीम इंडियाने सहा चांगले बॅट्समन आणि चार गोलंदाजांसोबत उतरले पाहिजे’.

विराट-रोहितची भूमिका महत्वाची

सेहवाग म्हणाला की, ‘टीम इंडिया अजिंक्य रहाणेला अतिरीक्त फलंदाजच्या रूपाने उतरवू शकते. त्यांनी चार विशेषज्ञ गोलंदाजांसोबत मैदानात येण्याचा प्रयत्न करावा. जर टीम इंडियाला जिंकायचं असेल तर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना महत्वाची भूमिका साकारावी लागेल. 

फलंदाजांना खास सल्ला

तो म्हणाला की, ‘फलंदाजांना माझा सल्ला आहे की, त्यांनी ऑफ स्टंपच्या बाहेरील बॉलसोबत छेडखानी करू नका. जास्तीत जास्त सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न करा. तुमचे शॉट स्ट्रेट ड्राईव्ह किंवा फ्लिप व्हायला पाहिजे. कुणाच्याही शॉर्ट पिच बॉलने जखमी होण्यासाठीही तयार रहा. शॉर्ट पिच बॉल अडवण्याऎवजी शरीरावर घ्या’.