मेलबर्न : टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे (IND vs ZIM) यांच्यात रविवारी 6 नोव्हेंबरला सामना रंगणार आहे. टीम इंडियासाठी (Team India) सेमी फायनलच्या (Semi Final) दृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे. हा सामना टीम इंडियाने जिंकल्यास थेट सेमी फायनमध्ये प्रवेश मिळेल. यासह कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर मोठा रेकॉर्ड होईल. झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडियाचा विजय झाला तर रोहितसेना सेमी फायनलमध्ये पोहचेल. तसेच कॅप्टन म्हणून रोहित शर्मा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा (Babar Azam) मोठा विक्रम मोडीत काढेल. (ind vs zim t 20 world cup 2022 team india captain rohit sharma have chance to braked babar azam most win matches as captain an single calendar year)
रोहितला बाबरचा एका कॅलेंडर इयरमध्ये सर्वाधिक टी 20 विजयाचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. सध्या रोहित आणि बाबर या दोघांच्या नावावर संयुक्तरित्या हा रेकॉर्ड आहे. बाबरने 2021 मध्ये सर्वाधिक टी 20 सामने जिंकण्याचा रेकॉर्ड केला होता.
बाबरने पाकिस्तानला आपल्या कॅप्टन्सीत 2021 मध्ये 20 टी सामने जिंकून देण्याचा कारनामा केला होता. तर रोहितच्या नेतृत्वात 2022 या वर्षात भारताने आतापर्यंत 20 सामने जिंकले आहेत. त्यामुळे झिंबाब्वे विरुद्ध सामाना जिंकून रोहित बाबरचा मोठा रेकॉर्ड ब्रेक करु शकतो.
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आणि अर्शदीप सिंग.
क्रेग एर्विन (कॅप्टन), रयान बर्ल, रेजिस चकबवा, तेंदई चटारा , ब्रॅडली इवांस, ल्यूक जोंगवे , क्लाइव मदांडे, वेस्ली मधेवेरे, वेलिंगटन मसाकाद्जा, टोनी मुन्योंगा, ब्लेसिंग मुजरबानी, रिचर्ड नगारवा, सिकंदर रजा, मिल्टन शुम्बा आणि सीन विलियम्स.