IND vs ZIM 2nd ODI :भारतीय गोलंदाजांसमोर झिम्बाब्वेच्या फलंदाजांची शरणागती, 161 धावांवर ऑलऑऊट

दुसऱ्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेची संपुर्ण टीम 161 धावांवर गारद झाली आहे. 

Updated: Aug 20, 2022, 04:23 PM IST
IND vs ZIM 2nd ODI :भारतीय गोलंदाजांसमोर झिम्बाब्वेच्या फलंदाजांची शरणागती, 161 धावांवर ऑलऑऊट  title=

मुंबई : हरारे येथे खेळवल्या जात असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेची संपुर्ण टीम 161 धावांवर गारद झाली आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर 162 धावांचे आव्हान असणार आहे. टीम इंडिया ही धावसंख्या पुर्ण करून मालिकेतला दुसरा विजय मिळवणार आहे. तर झिम्बाब्वेला पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे.  

टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे झिम्बाब्वे संघ प्रथम फलंदाजी उतरला होता. मात्र झिम्बाब्वेची सुरूवात चांगली झाली नव्हती. एका मागोमाग एक फलंदाजांचे विकेट जात होते. त्यामुळे झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ अवघ्या 161 धावांवर गारद झाला आहे. झिम्बाब्वेकडून सीन विल्यम्सने 42 धावा केल्या. त्याचवेळी रायन बर्लेने 39 धावांची नाबाद खेळी खेळली होती. टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूरने 3 बळी घेतले. दुसरीकडे दीपक हुडा, कुलदीप यादव, अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दरम्यान आता टीम इंडियासमोर 162 धावांचे आव्हान असणार आहे. हे आव्हान पुर्ण करून टीम इंडिया मालिकेत दुसरा विजय मिळवते की झिम्बाब्वे टीम इंडियाला रोखते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.