मॅचनंतरचा सुर्यकुमार यादव आणि पोलार्डचा तो स्पेशल फोटो व्हायरल

सूर्यकुमार यादवने वेस्ट इंडिजचा कर्णधार किरन पोलार्डसोबतचा एक फोटो शेअर केला आहे,

Updated: Feb 22, 2022, 03:38 PM IST
मॅचनंतरचा सुर्यकुमार यादव आणि पोलार्डचा तो स्पेशल फोटो व्हायरल title=

मुंबई : कोलकातामध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या T20 सामन्यात सूर्यकुमार यादवने आपली तुफानी खेळी खेळली आणि संघाला अडचणीतून बाहेर काढले. ज्यामुळे त्याला या सीरिजचा स्टार म्हटले जात आहे. यादरम्यानचा सुर्यकुमार एक फोटो ट्रेंड होत आहे. हा फोटो स्वत: सुर्यकुमारने शेअर केला आहे.

सूर्यकुमार यादवने वेस्ट इंडिजचा कर्णधार किरन पोलार्डसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो पोलार्डच्या खांद्यावर डोके ठेवून झोपलेला दिसत आहे. जेव्हा किरॉन पोलार्ड अंपायरशी बोलत होता. तेव्हा मॅच संपल्यानंतर थकल्यामुळे सुर्यकुमार पोलार्डच्या खांद्यावर डोके ठेवून झोपला आहे.

खरेतर हे दोन्ही खेळाडू इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून दीर्घकाळ एकत्र खेळत होते, ज्यामुळे या लोकांची इतकी खास मैत्री आहे. यावेळी मुंबई इंडियन्सने कायम ठेवलेल्या चार खेळाडूंमध्ये या दोघांच्या नावाचाही समावेश आहे. त्यामुळे हे दोघेही पुन्हा एकदा एकत्र खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.

सूर्यकुमार यादवने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याने हा बंधुभाव किंवा त्यांच्यातील हे नातं सुरुच असल्याच कॅप्शन दिलं आहे. या फोटोवर अनेक प्रकारच्या कमेंट्स आल्या, ज्यामध्ये मुंबई इंडियन्सनेही लिहिलं आहे की, हे खूप मजेदार दिसत आहे. या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात सूर्यकुमार यादवने केवळ 31 चेंडूत 65 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने आपल्या डावात 7 सिक्सर मारले आणि एक चौकारही लगावला. सूर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यर यांनी 37 चेंडूत 91 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे भारताने मोठी धावसंख्या उभारली.

टी-20 आणि वनडे टीममध्ये सूर्यकुमार यादवची एंट्री झाल्यामुळे भारताच्या  मिडिल ऑर्डरला खुप मोठा फायदा झाला आहे.