त्रिनिदाद : टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला T20 सामना जिंकला. आता दुसरी वनडे जिंकून टीम इंडियाला मालिकेत 2-0 अशी आघाडी घ्यायची आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या टी-20 सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक मोठे बदल करू शकतो. यामध्ये अनेक फ्लॉप खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
पहिल्या टी-20 सामन्यात रोहित शर्मासह सूर्यकुमार यादव ओपनिंगला आला होता. सूर्यकुमार यादवला ओपनिंगला फारसं चांगलं यश मिळू शकलं नाही. अशा स्थितीत दुसऱ्या सामन्यात त्याच्या जागी इशान किशनला संधी मिळू शकते. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यरला खेळण्याची संधी होती, मात्र तो सपशेल अपयशी ठरला. अशा स्थितीत त्यांच्या जागी दीपक हुड्डा यांना संधी दिली जाऊ शकते.
विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर खेळणार आहे. त्याचवेळी हार्दिक पांड्या पाचव्या क्रमांकावर खेळू शकतो. तर दिनेश कार्तिकला सहाव्या क्रमांकावर संधी मिळण्याची खात्री आहे. पहिल्या T20 सामन्यात तुफानी खेळ दाखवत कार्तिकने 19 चेंडूत 41 धावांची खेळी केली. त्याच्यामुळेच टीम इंडियाला विजयाचा सूर गवसला.
पहिल्या T20 सामन्यात स्पिनर्सने चांगला खेळ केला होता. रविचंद्रन अश्विन आणि रवी बिश्नोई यांनी 2-2 विकेट घेतल्या. त्याचवेळी रवींद्र जडेजाच्या खात्यात एक विकेट गेली. या तिन्ही खेळाडूंना टीम इंडियात पुन्हा संधी मिळू शकते. पहिल्या T20 सामन्यात अर्शदीप सिंगने अप्रतिम खेळ दाखवला त्यामुळे त्यालाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते.
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, सुर्यकुमार यादव दीपक हु्ड्डा, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंह.